जैन संघटना-प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा दुष्काळमुक्त होणार - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:49 PM2018-09-08T13:49:28+5:302018-09-08T13:50:48+5:30

भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.

 Jain organization- With the help of administration, the district will be drought-free - Guardian Minister Dr. Ranjeet Patil | जैन संघटना-प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा दुष्काळमुक्त होणार - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

जैन संघटना-प्रशासनाच्या सहकार्यातून जिल्हा दुष्काळमुक्त होणार - पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

Next
ठळक मुद्दे नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले.

अकोला : जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद असून, सुजलाम-सुफलाम अकोला अभियान अंतर्गत जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामांकरिता विनामूल्य मशीन्स उपलब्ध करून देणार आहे. या संधीचे सोने करण्यात येणार असून, भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिली.
सुजलाम-सुफलाम अकोला अभियानांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार, जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री रणजित पाटील बोलत होते. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, आ. गोवर्धन शर्मा, आ. बळीराम सिरस्कार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गांधी, जिल्हा अध्यक्ष सुभाष गादिया उपस्थित होते. पृथ्वीतलावर पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने, पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे, असे सांगत जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामध्ये शासन, प्रशासनासोबतच लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्य बहुमूल्य असून, जलसंधारणाच्या कामांसाठी ठरविण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करुन अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झालीत. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले. जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू.बोके जिल्ह्यातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जलसंधारणाच्या कामांसाठी तांत्रिक बाबींसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच बुलडाणाचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, जलसंधारण विभागाच्या उपअभियंता क्षितिजा गायकवाड, कृषी अधिकारी ढगे, भारतीय जैन संघटनेचे बुलडाणा जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा यांनी जैन संघटनेच्या माध्यमातून बुलडाणा जिल्ह्यात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन प्रकाश अंधारे यांनी, तर आभार उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले.
 

 

Web Title:  Jain organization- With the help of administration, the district will be drought-free - Guardian Minister Dr. Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.