बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:14 PM2018-02-12T13:14:04+5:302018-02-12T13:16:33+5:30

मेहकर : पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

Jain organization help for water convertion works in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे.

मेहकर : बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी-अधिक होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दुष्काळसदृष्य परीस्थीतीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी नियोजनाअभावी वाहुन जात असल्याने भारतीय जैन संघटनेच्या वतीने संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्थानीक जैन स्थानकामध्ये रविवारला नियोजनबध्द कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून, ३ मार्च पासून या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी-अधिक होऊन अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तर पिकांच्या उत्पादनावर सुध्दा याचा परीणाम जाणवत आहे. पावसाळ्यात पडणारे पाणी वाहुन जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात पडणाºया पाण्याची साठवणूक व्हावी, सर्वसामान्य जनतेसह शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी भारतीय जैन संघटना पुणे यांच्यावतीने ३ मार्च पासून संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गाळउपसा, नाले, बंधारे, तलाव, धरण यांचे खोलीकरण करणे, उपसलेला गाळ शेतकºयांच्या शेतामध्ये टाकणे यासह इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलालजी मुथा यांच्या प्रेरणेने या उपक्रमाला सुरवात करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी जैन संघटनेकडून १३४ जे.सी.बी, पोकलॅड यासह इतरही यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे. हा उपक्रम भारतीय जैन संघटनेचे सर्व समाजबांधव शासकिय अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक यांच्या सहभागाने राबविण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाची बुलडाणा जिल्ह्यात सुरवात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांची उपस्थीती राहणार आहे. या उपक्रमामुळे बुलडाणा जिल्हयातील ज्या गावात पाणीटंचाई आहे. अथवा ज्या गावात बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा होतो, अशा गावातील पाणीप्रश्न कायमचा मिटणार आहे. तर यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर समिती नेमुन त्या समितीच्या माध्यमातून हा उपक्रम युध्दपातळीवर राबविण्यात येणार आहे. यावेळी बुलडाणा येथील राजेश देशलहरा, मुन्नाजी बेगाणी, गादीयाजी, अक्षय देशलहरा यांची प्रमुख उपस्थीती होती. संचालन जयचंद बाठीया यानी केले. तर आभार निलेश नाहाटा यांनी केले.

Web Title: Jain organization help for water convertion works in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.