चिखलीत मराठा समाजातील आंदोलकांचे जलसमाधी आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 07:04 PM2018-07-25T19:04:16+5:302018-07-25T19:04:44+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले.
बुलडाणा - मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी काल चिखली शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी मराठा समाजातील काही तरूणांनी येथील वायझडी धरणात जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतले.
सकल मराठा समाजाच्यावतीने चिखलीत २४ जुलै रोजी कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर २५ जुलै रोजी काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत आरक्षणासाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा संकल्प करून सकल मराठा समाजाच्यावतीने शहराला लगूनच असलेल्या वायझडी धरणामध्ये पाण्यात उतरून मराठा समाजबांधवांच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले या
आंदोलनाची बातमी सर्वत्र पसरताच आंदोलनस्थळी पोलीसांनी धाव घेतली.
दरम्यान ठाणेदार महेंद्र देशमुख, नायब तहसिलदार झाल्टे यांच्या उपस्थित आंदोलनकर्ते प्रशांत ढोरे पाटिल, दत्ता सुसर, बंडु नेमाने, संजय कदम, निलेश लोखंडे, भगवान देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी कार्यकरत्यांनी प्रचंड घोषणा बाजी करून परीसर दणाणून सोडला होता. यावेळी कपील खेडेकर, विनायक सरनाईक, बंटी लोखंडे, शरद चिंचोले, अनिल गोराडे, बिट्टु देशमुख, संतोष देशमुख, पवण म्हस्के, बंडु नेमाने, शैलेश अंभोरे, दिपक सुरडकर, शैलेश डोणगावकर, शुभम खेडेकर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान धरणात उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी कलम १०७ नुसार कारवाई करून अटक केली व जामिनावर सुटका करण्यात आली आहे.