जळगाव जामोद : काट्याच्या लढतीने समीकरणाला मिळाला  छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 01:03 AM2017-10-10T01:03:11+5:302017-10-10T01:03:54+5:30

जळगाव जामोद: तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीची सोमवारी मतमोजणी पार पडली. त्यामध्ये सरपंच पदाची वडगाव पाटणची रिक्त जागा सोडून १८ सरपंच पदापैकी  १0 महिला सरपंच तर ८ पुरुष सरपंच विजयी झाले. पळसखेड  येथील सरपंच पदाच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन महिलाच  रिंगणात होत्या. त्यामुळे १८ पैकी ९ ऐवजी १0 महिला सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.

Jalgaon Jamod: The hole found in the equation for the fight of biting | जळगाव जामोद : काट्याच्या लढतीने समीकरणाला मिळाला  छेद

जळगाव जामोद : काट्याच्या लढतीने समीकरणाला मिळाला  छेद

Next
ठळक मुद्दे१८ पैकी १0 सरपंचपदी महिला विजयाचा जल्लोष

नानासाहेब कांडलकर। 
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीची सोमवारी मतमोजणी पार पडली. त्यामध्ये सरपंच पदाची वडगाव पाटणची रिक्त जागा सोडून १८ सरपंच पदापैकी  १0 महिला सरपंच तर ८ पुरुष सरपंच विजयी झाले. पळसखेड  येथील सरपंच पदाच्या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दोन महिलाच  रिंगणात होत्या. त्यामुळे १८ पैकी ९ ऐवजी १0 महिला सरपंच पदी विराजमान झाल्या आहेत. यावेळी प्रथमच थेट जनतेतून सर पंचपदाची निवडणूक असल्याने अनेक ठिकाणी काट्याच्या  लढती झाल्यात. त्यामुळे अनेकांच्या समीकरणाला छेद मिळत  वेगळाच निकाल बाहेर आला. त्यामुळे ‘कही खुशी कही गम’  अशी स्थिती दिसून आली.
मडाखेड बु. येथे विजय शालीग्राम कड (४७८ मते), सुरेश  विश्‍वनाथ पाचपोर ४११ मते यांचा ६७ मतांनी पराभव करून  सरपंचपदी विराजमान झाले. तर मडाखेड खुर्द येथे राजेश   समाधान सित्रे पाटील (३४८) यांनी सुरेश समाधान पोहरे  (१५८) यांच्या तब्बल (१९0) मतांनी मात करीत सरपंच  पदाचा मान मिळविला. निंभोरा बु. सरपंचपदी पांडुरंग हरी उगले  (३६९) हे विजयी झाले त्यांना बहुरंगी लढतीत विजय शंकर  सोनोने (२२७) यांना (१४२) मतांनी पराभूत केले. पळसखेड  येथे आशा सुमेध वानखडे (२२७) या सीमा मनोहर खंडेराव  (१0२) यांचा (१२५) मतांनी पराभव करीत सरपंचपदी  आरूढ झाल्या. खेर्डा खुर्द सरपंचपदी गोपाळ किसन उमरकर  (४७५) हे परमेश्‍वर शहादेव वानखडे (४0५) यांना पराभून  करून ७0 मतांनी विजयी झाले तर गाडेगाव बु. येथे सरळ  सामन्यात रमेश सखाराम नाईक (४९१) यांनी यशोधरा गौतम  निंबाळकर (३८१) यांच्यावर ११0 मतांनी मात करीत सरपंच पदाचा मान मिळविला.
टाकळी पारस्कर येथे विलास मनोहर पारस्कार (४१५) यांनी  संदीप गोविंदराव पारस्कार २२२ यांना तब्बल १९३ मतांच्या  फरकाने पराभूत करीत सरपंचपद पटकाविले. विलास पारस्कर  हे सर्वाधिक फरकाने विजयी झाले आहेत. भेंडवळ खुर्द सरपंच पदी सारिका विलास इंगळे (२२९) हय़ा अस्मिता विजय  सिरसाट (१७७) यांचा ५२ मतांनी पराभव करून आरूढ  झाल्या तर सातळी येथे बहुरंगी लढतीत शशिकांत जंगलीमन  रायपुरे (३२८) यांनी नजीकच्या प्रतिस्पर्धी प्रियंका राहुल इंगळे  (१७९) यांचा १४९ मतांनी पराभव करीत सरपंचपदाचा मान  मिळविला. झाडेगाव येथे मंगला रामरतन चोपडे (४१७) यांनी  रेखा किरण चोपडे (३४७) यांच्यावर ७0 मतांनी मात करीत  सरपंचपदी विजय मिळविला.
हिंगणा बाळापूर येथील सरपंचपदी ऊर्मिला शिवाजी सातपुतळे  (२४४) हय़ा विराजमान झाल्या. त्यांनी सुनीता हरिश्‍चंद्र  मानकर (२२४) यांचा अवघ्या २0 मतांनी पराभव केला.  गोळेगाव बु. सरपंचपदी अनंत प्रभाकर सुशीर (१७५) हे  विजयी झाले त्यांनी सरळ सामन्यात सुभाष गोपाळ हुरसाळ  (१५२) यांचा फक्त २३ मतांनी पराभव केला. गोळेगाव खुर्द ये थे योगमाया विठ्ठल पांडे (२९६) यांनी सत्यभामा भागवत पांडे  (२१९) यांचा ७७ मतांनी पराभव करून सरपंच पद पटकावले.  तर माहुली सरपंच पदाच्या त्रिकोणी लढतीत कमलाबाई एकनाथ  रोठे (१५८) यांनी संगीता गजानन रोठे (१२५) यांचेवर ३३ म तांनी बाजी मारली. बोराळा बु. येथे जयश्री विजय बुरकले  (३७२) यांनी पुष्पा प्रवीण म्हसाळ (३0६) यांचा ६६ मतांनी  पराभव करीत सरपंच पदाच्या मान मिळविला. बोराळा खुर्द सर पंच पदाच्या सरळ लढतीत सुरेखा प्रशांत तिजारे (३४८) यांनी  सविता गजानन बोदडे (२९५) यांच्यावर ५३ मतांनी आघाडी  घेत सरपंच पदाचा मान घेतला. पळशी वैद्य येथे सरपंचपदी  गणेशसिंग सरदारसिंग मोरे (३0७) हे विजयी झाले. त्यांनी  रवींद्र सोनाजी जाधव (२४७) यांचा ६0 मतांनी पराभव केला.  मांडवा येथे शिला नितीन उगले (३५८) यांनीसुद्धा अरुण महाले  (२८३) यांचा ७५ मतांनी पराभव करून सरपंच पदाचा मान  मिळविला.
निवडणूक निरीक्षक म्हणून उपविभागीय अधिकारी धनंजय  गोगटे, निवडणूक अधिकारी तहसीलदार डॉ. शिवाजी मगर,  नायब तहसीलदार जे.आर. दीक्षित व एच.डब्ल्यू. सोले यांनी  काम पाहिले. मतमोजणी तहसील कार्यालयात शांततेत पार  पडली. 
ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्त अत्यं त चोख ठेवण्यात आला होता. अवघ्या दीड तासात १८ सरपंच  पदाची व ६२ सदस्य पदाची मतमोजणी पार पडली.

ईश्‍वर चिठ्ठीने विजय घोषित
झाडेगाव येथील प्रभाग १ मधील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातील  खान खुश्रीदबानो आमीन व उषा नारायण भोंडोकार यांना समान  १११ मते पडली. त्यामुळे प्रणव आत्माराम भोपळे या विद्या र्थ्याकडून ईश्‍वर चिठ्ठी काढून खान खुश्रीदबानो यांना विजयी  घोषित करण्यात आले. तसेच गोळेगाव बु. येथील सुनिता  नवृत्ती हुरसाड या सदस्यपदासाठी फक्त दोन मतांनी विजयी  झाल्या. मडाखेड बु. येथे काँग्रेस विचारसरणीचे नऊपैकी सहा  सदस्य निवडून आले. परंतु सरपंचपदाचा उमेदवार मात्र भाजपा  विचाराशी निगडीत असणारा विजयी झाला. टाकळी पारस्कार  येथे सरपंचासह सर्व सदस्य माजी सभापती व्दय अंबादास बाठे  व हरीभाऊ पारस्कर यांच्या गटाचे विजयी झाले तर खेर्डा खुर्द  येथे रंगराव देशमुख गटाने बाजी मारली. 

Web Title: Jalgaon Jamod: The hole found in the equation for the fight of biting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.