जळगाव जामोद तालुक्यातील पेन्शनधारकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:02 AM2018-01-16T00:02:27+5:302018-01-16T00:04:10+5:30

जळगाव जामोद : तालुक्यातील जवळपास ३00 इपीएस या पेन्शनधारकांनी जळगावात ‘भीक मांगो’ आंदोलन केले व त्यानंतर स्थानिक तहसीलवर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. 

Jalgaon Jamod taluka's pensioners 'Bhik Mango' movement! | जळगाव जामोद तालुक्यातील पेन्शनधारकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन!

जळगाव जामोद तालुक्यातील पेन्शनधारकांचे ‘भीक मांगो’ आंदोलन!

googlenewsNext
ठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन शासनाने लक्ष देण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यातील जवळपास ३00 इपीएस या पेन्शनधारकांनी जळगावात ‘भीक मांगो’ आंदोलन केले व त्यानंतर स्थानिक तहसीलवर मोर्चा नेऊन तहसीलदारांना निवेदन सादर केले. 
संबंधित पेन्शनधारक हे एस.टी.महामंडळ,  फेडरेशन, वीज वितरण कंपनी, तसेच सर्व सहकार क्षेत्रातील होते. २00 रुपयांपासून तर केवळ २५00 रुपयापर्यंत या लोकांना पेन्शन मिळते. यामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. ही सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळी असून, यांनी जीवनभर सेवा दिली; मात्र त्यांना मिळणारी पेन्शन ही अपमानकारक आहे. 
आतापर्यंत पेन्शनधारकांनी अनेक आंदोलने केली; मात्र शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे एकिकडे भीक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. सदर निवेदन हे तहसीलदारामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले असून, निवेदनात ७५00 रुपये बेसिक पेंशन आणि त्यावर इतर भत्ते, मोफत वैद्यकीय सेवा इत्यादी मागण्यांचा समावेश होता. निवेदनावर ओ.पी.तायडे, हरिभाऊ जाधव, पी.एम.जोशी, महादेवराव इंगळे, व्ही.टी.नेमाडे, पंडितराव देशमुख, रामभाऊ उमरकर, रामभाऊ फासे, सोपान ठाकरे, अजाबराव पाटील, श्रीराम निकडे, अत्तरकार, तुळशीराम राजपूत, गायकी, शरद वानखडे, एम.एन.कर्‍हे, सतिश देशमुख, कायंदे, सिंग, कराळे, मिरगे, पद्मणे इत्यादीसह १00 जणांच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

Web Title: Jalgaon Jamod taluka's pensioners 'Bhik Mango' movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.