जांबुवंतीचा कोंडला श्वास; नदीला तीर्थात कधी बदलणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:31+5:302021-08-12T04:39:31+5:30

चिखली : शहरातील पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली एकमेव नदी ‘जांबुवंती’ नदीचा श्वास प्रदूषणामुळे कोंडला जात असल्याचे चित्र ...

Jambuwanti's condyloma breath; When will the river be turned into a pilgrimage? | जांबुवंतीचा कोंडला श्वास; नदीला तीर्थात कधी बदलणार ?

जांबुवंतीचा कोंडला श्वास; नदीला तीर्थात कधी बदलणार ?

Next

चिखली : शहरातील पावसाचे व सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली एकमेव नदी ‘जांबुवंती’ नदीचा श्वास प्रदूषणामुळे कोंडला जात असल्याचे चित्र आहे. पर्यायाने या नदीतून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याला दर्प घेण्याची वेळ आहे. याकडे कृषीमित्र तथा माजी नगरसेवक सचिन बोंद्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. तथापि नदीची ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचा मानसही व्यक्त केला आहे.

आजघडीला आपल्या कामाच्या व्यापातही सर्वांशी संपर्कात राहण्याचे मोठे माध्यम म्हणजेच समाजमाध्यमे बनली आहेत. याच समाजमाध्यमाचा खुबीने वापर करीत सचिन बोंद्रे यांनी शहरातील जांबुवंती नदीच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे. मध्यंतरी खोलीकरण व रूंदीकरणामुळे खळाळून वाहणारी ही नदी घाण, कचरा व जलपर्णी व इतर झाडाझुडुपांमुळे लुप्त झाल्यासारखी वाटत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शहरातील सांडपाणी व पावसाचे पाणी ही नदी वाहून नेते. परंतु, प्रदुषणाचा कळस गाठल्या गेल्याने या नदीतून पाणी हव्या त्या प्रमाणात वाहून जात नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून राहत असल्याने दुर्गंधीयुक्त या पाण्याचा उग्र दर्प येत आहे. याच समस्येकडे बोंद्रे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

नदी म्हणजे गावाची ओळख

भारत देशात अनेक काव्य, ग्रंथ, उपनिषद हे नदीवर रचलेले आहे. एवढे मोठे नदीचे महत्त्व असताना शहरातील एकमेव जांबुवंती नदीच्या रूपाने दैवी संचित असणारी आणि देवत्व घेऊन वाहणारी नदी प्रदूषित कशी होते ? याला जबाबदार कोण ? फक्त तीर्थक्षेत्रावरीलच नदीला आपण मानणार की आपल्या गावातल्या नदीलासुद्धा तीर्थात बदलणार?, असा महत्त्वपूर्ण सवाल कृषीमित्र सचिन बोंद्रे यांनी उपस्थित केला आहे. बोंद्रे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भाने एक व्हिडीओसह पोस्ट शेअर केली आहे. या माध्यमातून त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न चिखलीकरांना अंतर्मुख करणारा ठरत असल्याने त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

स्वत:पासून सुरुवात महत्त्वाची!

नदी म्हटले की धार्मिक स्थळ, आसपासच्या परिसराला तीर्थाचे स्वरूप प्राप्त करून देणारी जीवनवाहिनी. प्रत्येक नदीच्या काठावर अनेक दैवी ठिकाणे आपणास दिसतात. किंबहुना अनेक मोठमोठी व महत्त्वाची धार्मिकस्थळे, तीर्थक्षेत्रे ही नदीकिनारीच आहेत. इतके महत्त्व नद्यांना असताना चिखलीच्या प्रदूषणात, कचऱ्यात लुप्त होत जाणारी ‘जांबुवंती मोकळा श्वास घेऊ शकेल का’, या गोष्टीकडे आजतागायत कुणाचे लक्ष नसेल का? प्रश्न बरेच आहेत. पण सुरुवात महत्त्वाची आहे. ती आपणास करावीच लागेल, अशा शब्दात बोंद्रेंनी नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी पुढाकार देखील घेतला आहे.

Web Title: Jambuwanti's condyloma breath; When will the river be turned into a pilgrimage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.