बावनबीर येथे जावयाची आत्महत्या
By Admin | Published: February 12, 2017 12:27 AM2017-02-12T00:27:25+5:302017-02-12T00:27:25+5:30
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा येथील मृतक.
बावनबीर(जि. बुलडाणा), दि. ११- येथील जावयाने शेतातील धुर्यावरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
रामदास रामभाऊ वानखडे (वय ४८ वर्ष रा. शिवाजीनगर, तेल्हारा जि. अकोला) यांचा विवाह बावनबीर येथील नारायण तानाजी खंडेराव यांच्या संगीता नामक मुलीशी २२ वर्षांपूर्वी झाला. गेल्या दहा-बारा वर्षांपासून वानखडे यांची पत्नी माहेरी बावनबीर येथे मुलांसोबत राहत होती. दरम्यान, रामदास वानखडे हे अधून -मधून पत्नी व मुलाच्या भेटीकरिता येत होते. १0 फेब्रुवारी रोजी भेटीकरिता आले असता, त्यांनी इंदिरा गांधी विद्यालयानजीक असलेल्या एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील खंडारे व मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन सोनाळा पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावरून सोनाळा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन प्रेत उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे पाठविण्यात आले. तपास ठाणेदार सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बघेल हे करीत आहेत.