जयंत पाटील यांनी साधला 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:33+5:302021-02-10T04:35:33+5:30

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणेदेखील त्यांच्या सोबत होते. ना. शिंगणे यांनी हेल्पलाईन सेंटरच्या कामकाजाची सविस्तर माहिती ना. पाटील ...

Jayant Patil interacted with the activists of 'Swabhimani' | जयंत पाटील यांनी साधला 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांशी संवाद

जयंत पाटील यांनी साधला 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांशी संवाद

Next

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणेदेखील त्यांच्या सोबत होते. ना. शिंगणे यांनी हेल्पलाईन सेंटरच्या कामकाजाची सविस्तर माहिती ना. पाटील यांना दिली. ना. जयंत पाटील व ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या वतीने अ‍ॅड. शर्वरी रविकांत तुपकर, अ‍ॅड. अशोक सावजी, राधिका तुपकर, राणा चंदन, श्याम अवथळे, नितीन राजपूत व विनायक सरनाईक यांनी सत्कार केला. रविकांत तुपकर उपस्थित नसतानाही ना. पाटील यांनी आपल्या व्यस्ततेमधून एक तास स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरला दिला. यावेळी 'स्वाभिमानी'च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. रविकांत तुपकर हे शेतकरी चळवळीचे नेतृत्व आहे. राज्यात शेतकरी चळवळीचा एक प्रमुख चेहरा म्हणून तुपकरांकडे पाहिले जाते. अशा नेतृत्त्वाची विधानसभेत गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले होते. परंतु मध्येच काही राजकीय घडामोडी झाल्याने तुपकरांना संधी मिळाली नाही. परंतु अशा नेतृत्त्वाला खऱ्या अर्थाने जपले पाहीजे, पाठबळ दिले पाहीजे आणि आमच्या परीने आम्ही ते देऊच, अशा शब्दात ना. पाटील यांनी तुपकरांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी रायुकाँ प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, नरेश शेळके, संतोष रायपुरे, संगीतराव भोंगळ, सुमित सरदार यांच्यासह 'स्वाभिमानी'चे दत्ता जेऊघाले, ज्ञानेश्वर कल्याणकर, आकाश माळोदे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Jayant Patil interacted with the activists of 'Swabhimani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.