जीपला अपघात; १७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:20 AM2017-07-20T00:20:16+5:302017-07-20T00:20:16+5:30

नांदुरा : महावितरणचे विद्युत पोल बदलण्याचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी भरधाव बोलेरो उलटल्याने १७ मजूर जखमी झाल्याची घटना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ घडली.

Jeep accident; 17 injured | जीपला अपघात; १७ जखमी

जीपला अपघात; १७ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : महावितरणचे विद्युत पोल बदलण्याचे काम करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी भरधाव बोलेरो उलटल्याने १७ मजूर जखमी झाल्याची घटना नांदुरा मार्गावरील वडनेर भोलजीजवळ घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. महावितरणच्या विद्युत पोलचे कामाकरिता नांदुरा येथून नायगावकडे मजुरांना घेऊन जाणारी बोलेरो क्र.एमएच२७-एजी८८८६ ही गाडीचालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला जावून उलटली. या अपघातात गाडीमधील उमेशकुमार सुरजीतसिंग, शिवकुमार राजेंद्र भसराम, बलराम बरकडे, सोनासिंग सुखलाल मसराम (वय २०), मुकेश जगनसिंग वरशे (वय २०), पवनकुमार चुडामन वरशे, मुकेश शिवकुमार मडावी, यशवंतकुमार हिराचंद मडावी (वय २७), सुरेंद्र हिरासिंग मडावी (वय १९), काशिराम बलुरंग मेदारी, आशय सुरजित मसराम, जयदिन परमे, बरकतसिंग हेमराजसिंग परमे (वय २२), मोहन सोनरत मसराम (वय २५), सुरेंद्र पदराव (वय १८), अजय छोटीलाल गोटीया (वय २२), अनूप रमेश रोटरिया (वय २०) सर्व रा. चरगाव मध्यप्रदेश हे जखमी झाले.

Web Title: Jeep accident; 17 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.