खामगावात सराफा दुकानांना सील, बुलडाण्यात काळी गुढी!

By admin | Published: April 9, 2016 01:37 AM2016-04-09T01:37:20+5:302016-04-09T01:37:20+5:30

सराफा व्यापा-याचे आंदोलन तीव्र; कारागीरांचे हात थांबले.

Jewelery shops sealed in Khamagao, bullda black Gudi! | खामगावात सराफा दुकानांना सील, बुलडाण्यात काळी गुढी!

खामगावात सराफा दुकानांना सील, बुलडाण्यात काळी गुढी!

Next

बुलडाणा: गेल्या ३८ दिवसांपासून सराफा व सुवर्णकारांचा बंद असून हा बंद पारदर्शकपणे व्हावा यासाठी सराफा असोसिएशन अंतर्गत असणार्‍या सराफा दुकानांना सराफा असोसिएशनने सील लावले खामगावात सील लावले तर बुलडाणा येथे काळी गुढी उभारून सराफा व्यवसायिकांनी अभिनव आंदोलन केले. केंद्र सरकारने अबकारी कर आकारणीचा निर्णय रद्द करावा या मागणीसाठी देशभरातील सराफा व्यापार्‍यांनी दुकाने बंद आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन गेल्या ३८ दिवसांपासून सुरु आहे. दरम्यान काही सराफांकडून या बंद दरम्यान दागिने खरेदी-विक्री होत असल्याचे आरोप पाहता सराफा असोसिएशनने हा पवित्रा घेत सराफा असोसिएशनकडून खामगावातील सदस्यांचे दुकानांना बंद दरम्यान सील लावण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात केंद्र शासनाच्या जाचक निर्णयाविरूद्ध काळी गुढी उभारून आंदोलन केले.

Web Title: Jewelery shops sealed in Khamagao, bullda black Gudi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.