‘जिगाव’ ६९८ कोटींवरून १३,८७४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:30+5:302021-03-04T05:04:30+5:30

--आलेवाडी प्रकल्प-- आलेवाडी प्रकल्प २०५ कोटी ६१ लाख रुपयांचा असून, या प्रकल्पावर आतापर्यंत ८५ कोटी ३२ लाख रुपये खर्च ...

‘Jigaon’ from Rs 698 crore to Rs 13,874 crore | ‘जिगाव’ ६९८ कोटींवरून १३,८७४ कोटींवर

‘जिगाव’ ६९८ कोटींवरून १३,८७४ कोटींवर

Next

--आलेवाडी प्रकल्प--

आलेवाडी प्रकल्प २०५ कोटी ६१ लाख रुपयांचा असून, या प्रकल्पावर आतापर्यंत ८५ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी आणखी १२० कोटी २९ लाख रुपयांची गरज आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

--अरकचेरी प्रकल्प--

या प्रकल्पाची सिंचन क्षमता १,१६८ हेक्टर आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २७७.८५ कोटी रुपयांची गरज आहे. पैकी आतापर्यंत केवळ ५५ कोटी पाच लाख रुपये या प्रकल्पावर खर्च झाले आहेत.

--चौंढी--

चौंढी प्रकल्पाची एकूण किंमत १९० कोटी एक लाख रुपये आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत १११ कोटी ४८ लाख रुपये खर्च झाला आहे. हा प्रकल्पही २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे. प्रकल्पामुळे ९५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. गेल्या पाच ते सात वर्षांपासून हे तिन्ही प्रकल्प रखडलेले असून, जळगाव जामोद व संग्रामपूर या आदिवासी तालुक्यातील हे प्रकल्प आहेत.

Web Title: ‘Jigaon’ from Rs 698 crore to Rs 13,874 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.