सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह, तीन राजे राहणार हजर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 12:52 PM2018-01-12T12:52:57+5:302018-01-12T14:43:22+5:30

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

jijamata birth anniversary program in Sindkhed Raja | सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह, तीन राजे राहणार हजर

सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह, तीन राजे राहणार हजर

googlenewsNext

सिंदखेड राजा (बुलडाणा ) - राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्तसिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिजाऊंची 420 वी जयंती येथे साजरी केली जात आहे. या सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती असेल. अरविंद केजरीवाल गुरुवारी (11 जानेवारी) संध्याकाळी औरंगाबादेत दाखल झाले आहेत.

दरम्यान, सकाळी 7 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सूर्योदयासमयी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. विजय घोगरे, वंदना घोगरे, जिजाऊ सुष्टीचे व्यवस्थापक सुभाष कोल्हे, अर्चना कोल्हे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष डॉ. रेखा चव्हान व  सहका-यांनी  जिजाऊंच्या प्रतिमेची महापूजा केली. तर  नगरपालिकेच्या वतीने नगर अध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, उपाध्यक्षा सिमा शेवाळे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेची पूजा केली. यावेळी पालिकेच्या पदाधिकारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जाधव कुळाचे वंशज गणेश राजे जाधव, राजूकाका राजे जाधव, शिवाजी राजे जाधव, विजय राजे जाधव यांनी सहपरिवार महापूजा केली. सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार शशीकांत खेडेकर व शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ऊमा तायडे व त्यांचे सर्व सहकारी व जिल्हा परिषदेचे अधिका-यांनी जिजाऊंना अभिवादन केले.

Web Title: jijamata birth anniversary program in Sindkhed Raja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.