Jijau Janmotsav :  दीपाेत्सवाने उजळले माँ जिजाऊंचे जन्मस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 10:42 AM2021-01-12T10:42:48+5:302021-01-12T10:44:35+5:30

Jijau Janmotsav: माँ जिजाऊंच्या ४२२ व्या जन्माेत्सवाच्या पूर्वसंध्येला राजवाडा आणि परिसर दीपाेत्सवाने उजळून गेला हाेता.

Jijau Janmotsav: | Jijau Janmotsav :  दीपाेत्सवाने उजळले माँ जिजाऊंचे जन्मस्थळ

Jijau Janmotsav :  दीपाेत्सवाने उजळले माँ जिजाऊंचे जन्मस्थळ

Next
ठळक मुद्देमशालींची यात्रा यावर्षी काेराेनामुळे रद्द करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊंंना वंदन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : माँ जिजाऊंच्या ४२२ व्या जन्माेत्सवाच्या पूर्वसंध्येला राजवाडा आणि परिसर दीपाेत्सवाने उजळून गेला हाेता. दरवर्षी काढण्यात येणारी मशालींची यात्रा यावर्षी काेराेनामुळे रद्द करण्यात आली. जन्माेत्सवानिमित्त आयाेजित कार्यक्रमांचे लाईव्ह प्रेक्षपण करण्यात येणार आहे. 
माँ जिजाऊंच्या जन्माेत्सवानिमित्त राजवाडा आणि जिजाऊसृष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. काेराेनामुळे माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हाेणार आहे. जन्माेत्सवाच्या पूर्वसंध्येला जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिजाऊंंना वंदन करण्यात आले. तसेच राजवाडा व परिसरात दिवे लावण्यात आले.
जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला बुलडाणा येथील बॉम्बशोधक पथकाने येथील जिजाऊ राजवाडा व जिजाऊ सृष्टी परिसराची श्वानांच्या मदतीने कसून तपासणी केली. 
जिजाऊ जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राज्यभरातून जिजाऊ भक्त लाखोंच्या संख्येने येतात. मात्र, यंदा कोरोना नियम लागू असल्याने, तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांनी ११ व १२ जानेवारी रोजी शहरात १४४ कलम लागू केल्याने जिजाऊ भक्तांचा हिरमोड झाला आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुरक्षेची तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षण शेगोकार यांच्या पथकाने साेमवारी राजवाडा व जिजाऊ सृष्टी येथे  शेरा श्वानाच्या मदतीने तपासणी केली.

Web Title: Jijau Janmotsav:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.