जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्य़ाची सिंदखेड राजात जय्यत तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:50 AM2018-01-10T00:50:39+5:302018-01-10T00:53:04+5:30
बुलडाणा: राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी होणार्या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त सिंदखेड राजा नगरीसह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम सध्या सुरू असून, यावर्षीच्या या सोहळ्य़ास छत्रपती तथा सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू), कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी होणार्या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त सिंदखेड राजा नगरीसह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम सध्या सुरू असून, यावर्षीच्या या सोहळ्य़ास छत्रपती तथा सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू), कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.
मराठा सेवा संघातर्फे १९९४ पासून या सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात येत असून, अल्पावधीतच सोहळ्य़ाची व्याप्ती वाढल्यामुळे जालना रोडवरील जिजाऊ सृष्टीवर लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी पार पडत आहे. या निमित्त सिंदखेड राजा येथे ३ जानेवारीपासून जिजाऊ सृष्टीवर सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू झाला आहे. १२ जानेवारीला या दशरात्रोत्सवाचा राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मदिनी समारोप होतो. या निमित्त ११ जानेवारीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर दीपोत्सवाचे सायंकाळी आयोजन करण्यात आले असून, शहर परिसरातील महिला एक दीप राजवाडा परिसरात लावणार आहे. त्यानंतर ४२0 मशालींचा समावेश असलेली मशाल यात्रा निघणार आहे. १२ जानेवारीला दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, दुपारी ३ ते ६ या कालावधीमध्ये जिजाऊ सृष्टीवरील शिवधर्म पीठावर मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल.
या कार्यक्रमास छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले आणि छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्यासह नुकताच लोकसभेचा राजीनामा दिलेले नाना पटोले, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल खेडेकर (न्यूयॉर्क), मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे, महासचिव इंजिनिअर मधुकर मेहकरे यांच्या उपस्थितीत या सोहळ्य़ाच समारोप होणार आहे. दरम्यान, सायंकाळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय भाषण होईल. या कार्यक्रमानिमित्ताने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येऊन शेवटी आतषबाजीने या जन्मोत्सव सोहळ्य़ाचा समारोप होईल. त्या दृष्टीने जिजाऊ सृष्टीवर सध्या जय्यत तयारी सुरू असून, आतापासून नागरिक सिंदखेड राजा नगरीत पोहोचत आहे.
सूर्याेदयी महापूजा
१२ जानेवारीला राजवाड्यावर मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षांमधील प्रमुख जोडप्यांच्या हस्ते सूर्याेदयी राजवाड्यात महापूजा होईल. सात वाजता वारकरी दिंडी सोहळा शिवभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या नेतृत्वात राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत निघेल. आठ ते दहा वाजेदरम्यान जिजाऊ जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. प्रारंभी आ. शशिकांत खेडेकर,जि. अध्यक्ष उमा तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.