जिजाऊ, संत चोखामेळा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:00+5:302021-01-08T05:51:00+5:30

बुलडाणा : काेराेना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता जिल्ह्यात १२ जानेवारी रोजी साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव व १४ जानेवारी रोजी ...

Jijau, Saint Chokhamela Janmotsav will be celebrated in a simple manner | जिजाऊ, संत चोखामेळा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा हाेणार

जिजाऊ, संत चोखामेळा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा हाेणार

Next

बुलडाणा : काेराेना संसर्गाचा वाढता प्रभाव पाहता जिल्ह्यात १२ जानेवारी रोजी साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव व १४ जानेवारी रोजी संत चोखामेळा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दाेन्ही उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. तसेच दोन्ही कार्यक्रमांमध्ये २० लोकांच्या उपस्थितीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोविड १९ या आजाराचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दाेन्ही सोहळ्यांकरिता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून, थर्मल गनद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या व्यक्तींना ४८ तासापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह अहवाल प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. उपस्थित व्यक्तींनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे. जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित व्यक्तींना आयोजन समितीकडून ओळखपत्र देण्यात यावे, जन्मोत्सवादरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र हे स्वतंत्र असावेत. ओळखपत्राशिवाय कोणत्याही कार्यक्रमस्थळी प्रवेश देऊ नये. जिजाऊ जन्मोत्सव दरम्यान सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. प्रतीकात्मक जिजाऊ जन्मोत्सवासाठी व्यक्ती, आयोजक, निमंत्रित, सदस्य, सहायक सेवेकरी, खासगी सुरक्षा रक्षक व बंदोबस्तावरील लोक यांच्यासह कोणत्याही परिस्थितीत गर्दी, जमाव संख्या ५० पेक्षा जास्त होणार नाही याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या उत्सवादरम्यान कोरोना या विषाणूच्या प्रसारावर प्रतिबंध घालण्यासाठी गर्दी न करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करणे याबाबतची कारवाई नगरपालिका व पोलीस विभाग करणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी कळविले आहे.

Web Title: Jijau, Saint Chokhamela Janmotsav will be celebrated in a simple manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.