चिखली येथील जिनिंगला ठोकले कुलूप; अधिकार्‍यांना घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:55 AM2017-12-30T00:55:11+5:302017-12-30T00:55:28+5:30

चिखली : येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी आणलेला शेतमाल मोजून घेण्याऐवजी कोणतेही कारण न देता तीन दिवस खरेदी केंद्र बंद राहील, असे सांगून खरेदी केंद्र बंद केल्यामुळे येथे शेतमाल घेऊन आलेले सुमारे २00 शेतकरी आपल्या वाहनांसह अडकून पडले होते.  ही बाब आमदार राहुल बोंद्रे यांना कळताच त्यांच्या सूचनेवरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरेदी केंद्रावर जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, तहसीलदार आणि नाफेडचे मार्केटिंग अधिकार्‍यांना घेराव घातला; तसेच चिखली जिनिंगला कुलूप ठोकल्याने तडकाफडकी आदेश काढून खरेदी केंद्रावरील शेतमालाच्या मोजमापास सुरुवात करण्यात आली.

Jingling locked in Chikhli; Officers surround! | चिखली येथील जिनिंगला ठोकले कुलूप; अधिकार्‍यांना घेराव!

चिखली येथील जिनिंगला ठोकले कुलूप; अधिकार्‍यांना घेराव!

Next
ठळक मुद्देयुवक काँंग्रेसच्या आक्रमकतेने नाफेड खरेदी केंद्र सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी आणलेला शेतमाल मोजून घेण्याऐवजी कोणतेही कारण न देता तीन दिवस खरेदी केंद्र बंद राहील, असे सांगून खरेदी केंद्र बंद केल्यामुळे येथे शेतमाल घेऊन आलेले सुमारे २00 शेतकरी आपल्या वाहनांसह अडकून पडले होते.  ही बाब आमदार राहुल बोंद्रे यांना कळताच त्यांच्या सूचनेवरून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरेदी केंद्रावर जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, तहसीलदार आणि नाफेडचे मार्केटिंग अधिकार्‍यांना घेराव घातला; तसेच चिखली जिनिंगला कुलूप ठोकल्याने तडकाफडकी आदेश काढून खरेदी केंद्रावरील शेतमालाच्या मोजमापास सुरुवात करण्यात आली.
येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर बैलगाडीसह, टॅक्टर व इतर मालवाहू वाहनातून सुमारे २00 शेतकरी आपला शेतमाल घेऊन आलेले होते.; परंतु सदर खरेदी केंद्रावर माल घेण्यास टाळाटाळ करीत कोणतेही कारण न देता पुढील दोन ते तीन दिवस खरेदी केंद्र बंद राहील, असे जाहीर केल्या गेल्याने शेतकर्‍यांची गैरसोय व नुकसान पाहता आ.राहुल बोंद्रे यांच्या निर्देशानंतर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश सुरडकर व कार्यकर्त्यांनी खरेदी केंद्र गाठून शेतकर्‍यांचा शेतमाल तातडीने मोजून घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला. दरम्यान, जिनिंग-प्रेसिंग संस्थेच्या कार्यालयात कोणीही हजर नसल्याने कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले. कार्यकर्त्यांची ही आक्रमक भूमिका पाहताच जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक व तहसीलदार आदी अधिकारी केंद्रावर पोहोचले असता अधिकार्‍यांनाही घेराव घालण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी अधिकार्‍यांनी तातडीने संबंधिताना शेतमाल मोजून घेण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, युकाँचे रमेश सुरडकर, पिंटु गायकवाड, संजय गिरी, बाळु साळोख, भारत मोरे, पुरूषोत्तम हाडे, भगवान गायकवाड, संजय सोळंकी, राजू सावंत, किशोर साळवे, नंदु हाडे, संजय पडघान, प्रकाश आंभोरे, विश्‍वनाथ खोडके, दत्तात्रय देशमुख, विजय पडघान आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

Web Title: Jingling locked in Chikhli; Officers surround!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.