कनिष्ठ अभियंत्यास लोटपाट ; गुन्हा दाखल
By admin | Published: June 16, 2017 12:02 AM2017-06-16T00:02:42+5:302017-06-16T00:02:42+5:30
खामगाव : डांबरीकरण कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लोटपाट करून शिवीगाळ केल्याची घटना १४ जून रोजी ६.१५ वा. पिंप्री गवळी शिवारात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : डांबरीकरण कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास लोटपाट करून शिवीगाळ केल्याची घटना १४ जून रोजी ६.१५ वा. पिंप्री गवळी शिवारात घडली. एकनाथ सीताराम फुंडकर (वय ५६) हे सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. पिंप्री गवळी ते कारेगाव रोडचे डांबरीकरणचे काम सुरू असल्याने ते सुपरव्हिजनसाठी गेले व देखरेख करत असताना राजू ऊर्फ बळीराम मार्के रा. कारेगाव याने एकनाथ फुंडकर यांना म्हटले की, डांबरीकरणाचे काम बोगस होत आहे. तू काय पाहत आहे, असे म्हणून सरकारी कामात व्यत्यय आणून एकेरी भाषेत शिवीगाळ करून फुंडकर यांना लोटपाट केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून राजू ऊर्फ बळीराम मार्के कारेगाव याच्याविरुद्ध कलम ३५३, ३३२, ५०४ भादंविचा गुन्हा दाखल केला.