बुलडाण्यातील जेतवन बुद्धविहारात भरते ‘संडे स्कुल’
By admin | Published: October 8, 2016 02:06 PM2016-10-08T14:06:47+5:302016-10-08T14:06:47+5:30
शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याची जबाबदारी बुलडाण्यातील जेतवन बद्धविहाराने पेलली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. ८ - भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याची जबाबदारी बुलडाण्यातील जेतवन बद्धविहाराने पेलली आहे. महिनाभरापासून जेतवन बुद्धविहारामध्ये ‘संडे स्कुल’ अर्थात बुद्धधम्म संस्कार प्रशाला भरवून मुलांना बुद्धधम्म संस्काराचे धडे दिले जात असल्याने मुलांच्या रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग होत आहे.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म जीवन जगण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक धर्माचा अभ्यास केल्यानंतर धम्मदीक्षा घेतली. जगाला आज धम्माच्या शिकवणीची आवश्यकता आहे. बौद्ध धम्माची शिकवण पुढील पिढीकडे संक्रमीत करण्याची जबाबदारी थोरामोठ्यांची असून, धम्माचा प्रसार व प्रचार करण्याकरिता सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
भगवान गौतम बुद्धांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवून शांतताप्रिय समाज निर्माण करण्याकरिता पुढच्या पिढीवर धम्म संस्कार रूजविण्यासाठी बुलडाणा येथील जेतवन बद्धविहारामध्ये विदर्भ हाऊसिंग सोसायटीच्यावतीने ‘संडे स्कुल’ भरविण्यात येते. मुलांच्या रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग होण्यासाठी प्रत्येक रविवारला मुलांना जेष्ठ विचावंत व बुद्ध धर्माचे अभ्यासक बापुसाहेब गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली जेतवन बुद्धविहारात ‘संडे स्कुल’च्या माध्यमातून बुद्धधम्म संस्काराचे धडे दिले जातात.
यामध्ये जेतवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष दिलीपराव जाधव, पी.एस.मेढे, जी.एल.शिरसाट, जी.वाय.बाभुळकर, एच.एन.मोरे, अॅड.गवई व जेतवन महिला मंडळ यांनी प्रत्येक रविवारी सकाळी १० ते ११ या वेळेत वय वर्षे ६ ते १२ वयोगटातील मुले व मुली यांच्यावर बुद्ध धर्माचे संस्कार रूजविण्याचे चांगले कार्य हाती घेतले आहे. गेल्या महिन्याभरापासून धम्म संस्कार पुढच्या पिढीवर रूजविण्याचे कार्य जेतवन बुद्धविहारामध्ये सुरू असून, त्याला मुलांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
नविन पिढीमध्ये बुद्ध धम्म संस्कार रूजविण्यासाठी बुलडाण्यातील जेतवन बुद्धविहारामध्ये संडे स्कुल अर्थात बुद्धधम्म संस्कार प्रशाला सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या रविवारच्या सुट्टीचा सुद्धा सदुपयोग होत आहे. ५० पेक्षा जास्त मुले बुद्धधम्म संस्कार प्रशालाला उपस्थित राहतात.
- पी.एस.मेढे, सचिव, जेतवन बुद्धविहार विदर्भ हाऊसिंग सोसायटी, बुलडाणा