शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जोपासा
By admin | Published: October 29, 2014 10:45 PM2014-10-29T22:45:32+5:302014-10-29T22:58:55+5:30
बुलडाणा येथे मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मारोती खेडेकर यांचे आवाहन
बुलडाणा : शिक्षणक्षेत्र हे नव्या पिढीला अधिक सजग व जागृत करून आधुनिक विकासाची दृष्टी देत असते. या क्षेत्राचे पावित्र्य जोपासण्याची जबाबदारी सर्वांची असून, मुख्याध्यापकांनी नेतृत्व करताना अधिक व्यापक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. येणार्या काळात मुख्याध्यापकांसमोर निर्माण झालेले अनेक प्रश्न पाहता सर्वांनी संघटितपणे उभे राहिल्यास कुठलाही प्रश्न सहज सुटू शकतो. त्यामुळे संघटित होऊन संघर्षासाठी तयार रहा, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडेकर यांनी केले.
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त मंडळ तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात तीन दिवसीय ५४ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.विक्रम काळे, शिक्षण संचालक सज्रेराव जाधव, माजी आमदार शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, एस.पी.जवळकर, स्वागताध्यक्ष विश्वनाथ माळी, समाधान सावळे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, युनूस पटेल, मनोहर सोनवणे आदी उपस्थित होते. या संमेलनात मुख्याध्यापक संघाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले तसेच स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. संचालन अजिम नवाज राही यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे यांच्यासह विलास भारसाकळे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.