सोयाबीन उत्पादक शेतक-यांना न्याय देणार- विखे पाटील
By admin | Published: October 10, 2016 02:59 AM2016-10-10T02:59:11+5:302016-10-10T02:59:11+5:30
विरोधी पक्षनेत्यांनी केली सोयाबीन पिकाच्या नुकसानाची पाहणी.
शेगाव (जि. बुलडाणा), दि. ९- राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. विखे पाटील यांनी रविवारी शेगाव तालुक्यातील टाकळी हाट येथील अतवृष्टीमूळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
काँग्रेसच्या स्वराज्य संकल्प अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी ते शेगावात आले होते. प्रथम त्यांनी अतवृष्टीमुळे खराब झालेल्या विश्वास ढोले या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाच्या नुकसानाची त्यांनी पाहणी केली. सरकार सोयाबीनच्या आधारभुत किंमतीपेक्षा कमी भावाने सोयाबीन खरेदी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बुलढाणा जिल्हा तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आ.राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते.