ज्योती जाधव पहिल्या महिला मुख्याधिकारी
By Admin | Published: April 17, 2015 01:34 AM2015-04-17T01:34:45+5:302015-04-17T01:34:45+5:30
सिंदखेडराजा नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी ज्योती जाधव.
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या पावन भुमीमध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी पहिल्यांदाच महिला मुख्याधिकारी म्हणून ज्योती शिवाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. बुधवारला त्यांनी पदाचा कार्यभार घेतला आहे. ज्योती शिवाजी जाधव ह्या तासगाव जि.सांगली येथील रहिवाशी असून त्यांनी बीएएमएस नंतर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली व त्या सिंदखेडराजा नगर परिषदेच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी म्हणून रुजु झाल्या. सावित्रींच्या लेकींची जिजाऊ माँ साहेबांच्या नगरीतील ही निवड महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. *उपविभागीय अधिकारी रुजू सिंदखेडराजा येथील महसूल उपविभागीय अधिकारी डॉ.विवेक घोडके यांची नुकतीच बदली झाली आहे. दरम्यान त्यांच्या जागेवर नविन महसूल उपविभागीय अधिकारी म्हणून डॉ.सचिन खल्लाळ हे १0 एप्रिल रोजी रुजू झाले आहेत.