चिखलीचे कैलास पवार सियाचीनमध्ये शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 11:41 AM2021-08-03T11:41:58+5:302021-08-03T11:42:21+5:30

Kailash Pawar : देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेल्या चिखलीतील कैलास भारत पवार या लष्करी जवानाला वीरमरण आले. ते महार बटालियनमध्ये कार्यरत होते.

Kailash Pawar of Chikhali martyred in Siachen | चिखलीचे कैलास पवार सियाचीनमध्ये शहीद

चिखलीचे कैलास पवार सियाचीनमध्ये शहीद

googlenewsNext

चिखली (जि. बुलडाणा) : देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेल्या चिखलीतील कैलास भारत पवार या लष्करी जवानाला वीरमरण आले. ते महार बटालियनमध्ये कार्यरत होते. सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले. 
कैलास पवार हे गेल्या २ ऑगस्ट २०२० पासून हिमालय पर्वत रांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये कर्तव्य बजावत होते. आपल्या सहकाऱ्यांसह बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत त्यांचा पाय घसरला आणि  ते खाली कोसळले. उपचारादरम्यान १ ऑगस्ट रोजी कैलास पवार यांची प्राणज्योत मालवली. दिवंगत जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर ४ ऑगस्ट लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

सहा महिन्यांची मिळाली होती सुट्टी! 
शहीद जवान कैलास पवार यांची ड्युटी १ ऑगस्टला संपली होती. अत्यंत खडतर कर्तव्य बजावल्या नंतर सहा महिन्यांच्या सुट्टीवर ते चिखलीला येणार होते. मात्र, तत्पूर्वी त्यांना वीरमरण आले.

Web Title: Kailash Pawar of Chikhali martyred in Siachen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.