काकणवाडा येथे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम
By admin | Published: September 3, 2014 08:55 PM2014-09-03T20:55:30+5:302014-09-03T20:57:21+5:30
संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील ‘एक गांव एक गणपती ’ची परंपरा कायम.
काकणवाडा : संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बु. येथे तीन वर्षांपासून सुरु करण्यात आलेली ह्यएक गांव एक गणपती ह्णची परंपरा यंदाही कायम आहे. गावात एकता गणेश उत्सव मंडळामार्फत एक गाव एक गणपतीचा आदर्श ग्रामस्थ जोपासत आहेत.
गणेश उत्सवासोबतच प्रत्येक सार्वजनिक उत्सवात जातीय सलोखा राखल्या जावा. गावात एकोपा निर्माण व्हावा, शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी एक गाव एक गणपतीचा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न काकणवाड्यातील ग्रामस्थांच्या पुढाकाराने केला जात आहे. आदर्श मंडळाचे अध्यक्ष े अध्यक्ष गजानन ढोकणे यांच्या मार्गदर्शनात एक गाव एक गणपतीची संकल्पना साकारल्या जात असून कार्यकारिणीमधे रमेश सोळंके, निलेश घ्यार, दत्ता परिसे, गजानन सोळंके, प्रकाश गवळी, रामभाऊ परिसे, शुभम दुतोंडे, मंगेश नृपनारायण, शेख याकूब, दशरथ परिसे, गणेश सौदागर, सोपान परिसे आदींचा समावेश आहे. एक गाव एक गणपतीच्या माध्यमातून संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा येथील ग्रामस्थांनी नविन आदर्श समाजापुढे ठेवला आहे.