कालिंका माता गड परिसर हिरवाईने नटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:21 AM2021-07-22T04:21:53+5:302021-07-22T04:21:53+5:30
धामणगांव धाडः विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवरील डोंगराच्या कुशीत वसलेला कालिंका माता मंदिर ...
धामणगांव धाडः विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवरील डोंगराच्या कुशीत वसलेला कालिंका माता मंदिर परिसरातील गड सततच्या पावसामुळे हिरवाने नटला आहे़ डाेंगरातील खळखळून वाहणारे पाणी व निसर्गरम्य परिसर पर्यटकांसाठी आकर्षित करीत आहे़ कालिंका मातेच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे़
कालिंका माता मंदिर हे जालना जिल्ह्यातील मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर आहे़ नवसाला पावणारी देवी म्हणून हे मंदिर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे़ या ठिकाणी जुलै महिन्यात महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम होतात, तसेच या ठिकाणी मोठी यात्रा भरते, तसेच या ठिकाणी जोरदार पावसामुळे डोंगराळ भागातून पावसाचे धबधबे वाहत असतात़ त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक डोंगराळ भागात निसर्गाचा आनंद लुटतात, तसेच वन्यप्रेमी या भागात भोजनाचा आनंद घेतात. शाळकरी मुलांची सहलही येथे दरवर्षी येत हाेत्या़ येथे वालसावंगी, वाढोणा, पद्मावती, धामणगाव, धावडा, गुम्मी, जनुना, मासरूळ, मढ, विझोरा आदी भागांतील गावकरी देवीचा भंडारा करतात, तसेच या ठिकाणी कीर्तन, भजन आदी कार्यक्रम पार पडतात, तसेच लहान मुले पायी दर्शनासाठी येतात तसेच दिवसभर हिरवाईत खेळतात़ परिसरात सध्या भाविकांची दर्शनासाठी माेठी गर्दी हाेत आहे़