डोणगाव येथे कॅन्डल मार्च काढून २६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:03 PM2017-11-27T19:03:56+5:302017-11-27T19:09:04+5:30
श्री शिवाजी हायस्कूलच्या स्काऊट गार्डड व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी व गावातील विविध संघटनांनी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : स्थानिक श्री शिवाजी हायस्कूलच्या स्काऊट गार्डड व हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी व गावातील विविध संघटनांनी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये शहीद झालेल्या जवानांना संपूर्ण गावातून कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली.
कॅन्डल रॅलीला श्री शिवाजी हायस्कूल येथून जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर, पं.स. सदस्य निंबाजी पांडव, ठाणेदार आकाश शिंदे, माजी प्राचार्य जिवनसिंह दिनोरे, माजी सरपंच संजय आखाडे, सुरेश फिसके, गजानन सातपुते, हमीद मुल्लाजी, सुरेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरवात झाली व त्यानंतर डोणगाव ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ संपूर्ण उजाळा करण्यात आला. २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या हल्ल्याविषयी व त्यामध्ये शहीद झालेल्या शुरविरांविषयी ठाणेदार आकाश शिंदे, शिवाजी हायस्कूलचे उपप्राचार्य अशोक मगर, जि.प.सदस्य राजेंद्र पळसकर यांची मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन गजानन सातपुते व हमीद मुल्लाजी यांनी केले. तर कार्यक्रमाचे आयोजन सुरेंद्रसिंह चौहान यांनी केले होते. कार्यक्रमाला मित्रसागर परिवार, संजीवनी परिवार, पत्रकार संघ, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.