किनगाव जट्टू येथे काेराेना तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:23 AM2021-06-24T04:23:41+5:302021-06-24T04:23:41+5:30
किनगाव येथील बसस्थानक परिसरातील शेख नजाकत शेख सखावत व शेख तालेब शेख बुढण यांचे स्वस्त धान्याचे दुकान आहे़ ...
किनगाव येथील बसस्थानक परिसरातील शेख नजाकत शेख सखावत व शेख तालेब शेख बुढण
यांचे स्वस्त धान्याचे दुकान आहे़ अन्नसुरक्षा योजनेंतर्गत कोरोना संसर्ग आजारामुळे गोरगरीब जनतेला शासनाचे वतीने गहू ,डाळ, तांदूळ मोफत वाटप करण्यात येते.
मंगळवारी धान्याचे वाटप सुरू असताना प्राथमिक आरोग्य केंद्र शिवनी पिसा व कोविड सेंटर लोणार यांचे संयुक्त विद्यमाने दुकानासमोर शिबिर ठेवण्यात आले हाेतेे़ यावेळी नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली़ यावेळी १०० जणांची तपासणी करण्यात आली़ यावेळी निलेश महाजन ,शेख तोफिक शेख नजाकत शेख तालेब यांची उपस्थिती होती़ तपासणी करण्याकरिता डाॅ़ कविता भिसे, वैभव गायकवाड, सुधाकर सरकटे ,आकाश मापारी ,डा़ॅ खोडके आरोग्य सहायक एनजी सानप, परिचारक जगताप यांनी सहकार्य केले़