हिवरा आश्रम परिसरात काेराेनाची लाट ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:24 AM2021-06-03T04:24:51+5:302021-06-03T04:24:51+5:30
हिवरा आश्रम : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने सर्वतोपरी नागरिकांच्या ...
हिवरा आश्रम : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने सर्वतोपरी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शर्थीचे प्रयत्न केले आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे दुसरी लाट आटाेक्यात आली आहे़ परिसरात काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात कमी झाली आहे़ ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या काेविड सेंटरमधून दाेन रुग्णांना साेमवारी सुटी देण्यात आली़ आठ-दहा दिवसांपूर्वी हिवरा आश्रम येथील ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून परिसरातील नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबली आहे़ परिसरातील रुग्ण या रुग्णालयाचा लाभ घेत आहेत. सद्यस्थितीत या रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. कर्मचारी वर्गाचा प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे रुग्ण सुखावले असून कोरोनाविषयीची भीती नष्ट झाली आहे. साेमवारी दाेन काेराेना रुग्णांना सुटी देण्यात आली आहे़ दाेन्ही रुग्णांना टाळ्यांच्या गजरात निराेप देण्यात आला़ रुग्णांवर उपचारासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित धांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण पागोरे, डॉ. बसवेश्वर धाडकर, डॉ. पल्लवी कुऱ्हाळे, डाॅ. शिवानी मिटकरी, डाॅ. अजहर शेख, किरण काकफळे, अश्विनी राजगुरू, अक्षय धोंडगे व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत़