कर्मयोगी संत शुकदास महाराज यांचे निधन
By Admin | Published: April 4, 2017 10:46 AM2017-04-04T10:46:16+5:302017-04-04T10:46:16+5:30
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजश्री यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे.
>ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 4 - विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजश्री यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले आहे. औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये ४ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने त्यांची प्राणज्योत माळवली.
सव्वा कोटीहून अधिक रुग्णांना व्याधीमुक्त करणार्या महाराजश्रींना १७ मार्चला हृदयाची गती अनियमित झाल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरुवातीच्या काळात प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटर आणि डायलेसिसवर ठेवण्यात आले होते.
- हिवरा बुहया छोटयाशा खेडयात 24 नोव्हेंबर १९४३ रोजी त्यांचा जन्म झाला.
- विवेकानंदांच्या दिव्य विचारांपासून प्रेरणा घेऊन १४ जानेवारी १९६५ रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना
- त्याच्या वडिलांचे नाव बळीरामजी व आईचे नाव गंगा माता
- आरोग्य, शिक्षण,कृषी क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले
- संपूर्ण आयुष्य समाज हितासाठी झिजविले
- सायटिका रूग्णांसाठी न्युरोपॅथी विकसित केली
- महाराजश्री अनंतात विलीन झाल्याचे कळताच सर्वक्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.