कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे सेवाव्रतींसाठी उर्जास्रोत- विखे  पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:44 PM2017-09-11T23:44:54+5:302017-09-11T23:45:41+5:30

नि:स्पृह कर्मयोगी ही उपाधी आपल्या कर्तृत्वाने  सार्थ रूपाला आणणारे तसेच वानप्रस्थ आश्रम स्वीकारून  व्रतस्थ जीवन जगत असताना नि:स्वार्थ, निष्कलंक,  समाजसेवेचा वसा घेतलेले कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे  सेवाव्रतींसाठी ऊर्जास्रोत म्हणून कायम अग्रस्थानी राहतील,  असा विश्‍वास राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे  पाटील यांनी व्यक्त केला.

Karmayogi Tatyasheb Bondre for the service of Vergheshot - Vikhe Patil | कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे सेवाव्रतींसाठी उर्जास्रोत- विखे  पाटील

कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे सेवाव्रतींसाठी उर्जास्रोत- विखे  पाटील

Next
ठळक मुद्देबोंद्रे पिता-पुत्रांनी सुरू केलेला रुग्णसेवेचा यज्ञ तेवत राहो -  मुकुल वासनिकतात्यासाहेब बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसानिमित्त  आयोजित कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: नि:स्पृह कर्मयोगी ही उपाधी आपल्या कर्तृत्वाने  सार्थ रूपाला आणणारे तसेच वानप्रस्थ आश्रम स्वीकारून  व्रतस्थ जीवन जगत असताना नि:स्वार्थ, निष्कलंक,  समाजसेवेचा वसा घेतलेले कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे  सेवाव्रतींसाठी ऊर्जास्रोत म्हणून कायम अग्रस्थानी राहतील,  असा विश्‍वास राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे  पाटील यांनी व्यक्त केला.
कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सव  वाढदिवसानिमित्त आयोजित दोन दिवसीय भव्य महाआरोग्य  शिबिराचे औपचारिक उद्घाटन राज्याचे विरोधी पक्षनेते ना.  राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तर अ.भा.ु  काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या शुभहस् ते ११ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता पार पडले. यावेळी  आमदार राहुल बोंद्रे,  राधेश्याम चांडक, डॉ.  उल्हास पाटील,  जनुभाऊ बोंद्रे, बाबुराव पाटील, दिलीपकुमार सानंदा,  बबनराव चौधरी, एॅम्पथी फाउंडेशनचे डॉ. सुंदरम, अँड. हरीष  रावळ, श्याम उमाळकर, संजय राठोड, विजय अंभोरे,  प्रसेनजित पाटील, प्रा. नरेंद्र खेडेकर, प्रकाश पाटील, हाजी  रशिदखा जमदार, मुक्त्यारसिंग राजपूत, रामविजय बुरुंगले,  कासम गवळी, मनोज कायंदे, संगीता पांढरे, जयश्री शेळके,  ज्योती पडघान, डॉ.  सत्येंद्र भुसारी, डॉ.  सरिता पाटील, प्रमोद  अवसरमोल, दीपक रिंढे, रमेश घोलप, यांची प्रमुख उपस्थि ती होती. यावेळी पुढे बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की,  कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या समाजसेवेचा वारसा घेऊन  आ. राहुल बोंद्रे यांनी त्यांचे कार्य मोठय़ा प्रमाणावर विस् तरण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच राज्य शासनासमोर एक  नि:स्वार्थ सेवा करणारे आदर्श नेतृत्व म्हणून त्यांचा  नावलौकिक आहे. ही बाब केवळ कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे  यांच्या विचारामुळेच प्रत्यक्षात आले असे, त्यांनी स्पष्ट केले.
तर या शिबिराचे उद्घाटक मुकुल वासनिक यांनी जिल्हाभरा तील विविध व्याधीग्रस्त रुग्णांसाठी नि:शुल्क वैद्यकीय त पासण्या, औषधोपचार व निदान झालेल्या आणि  शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व  तरतूद उभी करून देण्याची सेवा करणारे अनुराधा मिशन व  ज्यांच्या प्रेरणेने हे कार्य सुरू झाले ते कर्मयोगी तात्यासाहेब  बोंद्रे यांचा वारसा सक्षमपणे आमदार राहुल बोंद्रे चालवित  असल्याचे स्पष्ट करून या पिता-पुत्रांनी सुरू केलेला  रुग्णसेवेचा हा यज्ञ कायम तेवत राहो, अशी अपेक्षा मुकुल  वासनिक यांनी व्यक्त केली. तर प्रस्ताविकात आ. राहुल बोंद्रे  यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्यातून समाजसेवा हे  अनुराधा मिशनने गेली २७ वष्रे अविरतपणे सुरू ठेवले आहे.  हे केवळ तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच शक्य होऊ  शकले आहे. सन १९९0 पासून वानप्रस्थाश्रम स्वीकारल्या पासून त्यांनी समाजसेवेला वाहून घेतले. सहकार, शिक्षण  आणी आरोग्य या माध्यमातून समाजाला जे जे देता येईल  ते-ते प्रदान करण्याचा त्यांचा संकल्प राहिला आहे.   त्यामुळेच अनुराधा परिवाराने चिखलीमध्ये सुसज्ज आणि  सर्व सोयी-सुविधांयुक्त बहूद्देशीय १00 खाटांचे कर्मयोगी  मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस बाळगला  असून, त्याच्या बांधकामास सुरुवातही केली आहे.. लवकरच  ते हॉस्पिटल जनसेवेत दाखल होईल, असा मानसही त्यांनी  व्यक्त केला. अनुराधा मिशन वरील प्रेमामुळे जिल्हाच नव्हे  तर राज्यभरातील विविध वैद्यकीय शासकीय, अशासकीय  संस्थांनी, आपल्या क्षेत्रात नामांकित तज्ज्ञ डॉक्टारांनी,  रुग्णसेवा पुरविणार्‍या ट्रस्ट आणि या कामात आर्थिक स्वरू पाचे योगदान देणार्‍या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याबद्दल आ.  बोंद्रे यांनी ऋण व्यक्त केले. महाआरोग्य शिबिराचा दुसर्‍या  दिवशी २५ हजारांवर रुग्णांनी लाभ घेतला. सूत्रसंचलन प्रा.  उन्मेश जोशी यांनी तर आभार दीपक देशमाने यांनी मानले.

Web Title: Karmayogi Tatyasheb Bondre for the service of Vergheshot - Vikhe Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.