कर्नाटक, झारखंड राज्याने घेतली बुलडाण्यातील नदी खोलीकरणाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:06 PM2019-01-22T18:06:42+5:302019-01-22T18:07:31+5:30
बुलडाणा: जिल्ह्यात गतवर्षी नदी खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून यावर्षीचीही कामे हाती घेण्यात आली आहेत.
बुलडाणा: जिल्ह्यात गतवर्षी नदी खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली असून यावर्षीचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. दरम्यान, कर्नाटक, झारखंड राज्यातील अधिकाºयांनी बुलडाण्यातील नदी खोलीकरणाच्या कामांची दखल घेऊन या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. कामाचा एक आदर्श नमुना पाहण्यासाठी कर्नाटक राज्यातील सरकारी अधिकारी व झारखंड राज्यातील प्रधान या संस्थेचे पदाधिकारी बुलडाणा तालुक्यातील साखळी बु. येथे भेट देऊन पाहणी केली.
वाढत्या दुष्काळामुळे गाळमुक्त धरण, नदी खोलीकरण करण्याचे काम भारतीय जैन संघटना व शासन यांच्या माध्यमातून राबविण्यात येते. बुलडाणा जिल्ह्यात हे काम युद्धपातळीवर राबविण्यात आले. बुलडाण्याचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या अभियानात समाविष्ट झालेल्या प्रत्येक गावांमध्ये गाळ काढण्याच्या मोहीमेला शेतकºयांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत नदी किंवा धरणातील गाळ आपल्या शेतात टाकून शेताची सुपीकता वाढवली आहे. फक्त नदी-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, व सरळीकरण या एकाच गोष्टीवर भर न देता नदी व धरणातून गाळ काढून तो शेतामध्ये टाकण्याचा महत्वकांक्षी उपक्रम जिल्ह्यात गतवर्षी राबविण्यात आला आहे. दुष्काळावर मात करणाºया नदी खोलीकरणाच्या या कामांची इतर राज्यातही दखल घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात झालेले गाळमुक्त धरण व नदी खोलीकरणाचे काम पाहण्यासाठी कर्नाटक राज्यातील सरकारी अधिकारी व झारखंड राज्यातील प्रधान या संस्थेच्या पदाधिकाºयांनी जिल्ह्याला भेट दिली. सध्या सुरू असलेल्या कामाची या अधिकाºयांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय जैन संघटना, जिल्हा मृदसंधारण अधिकारी, ग्रामपंचायत साखळी बु. यांच्या संयुक्त विद्यमाने १४ डिसेंबर पासून नदी खोलीकरणाचे काम सुरू असून हे काम साखळी बु. च्या सरपंच यांच्या देखरेखीखाली चांगल्या प्रकारे होत आहे. या कामाचा एक आदर्श नमुना म्हणून स्थानिक अधिकाºयांनी कर्नाटक राज्यातील सरकारी अधिकारी व झारखंड राज्यातील प्रधान या संस्थेच्या पदाधिकाºयांना साखळी बु. शिवारातील नदी खोलीकरण काम दाखऊन त्याची माहिती दिली. नदी खोलीकरणाचे काम पाहून दोन्ही राज्यातील अधिकारी व पदाधिकाºयांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांनी जाणून घेतले नदी खोलीकरणाचे फायदे
कर्नाटक व झारखंड राज्यातील राज्यातील अधिकाºयांनी नदी खोलीकरणाच्या कामाची पाहणी करून त्याचे फायदे जाणून घेतले. यावेळी साखळी बु. येथील सरपंच विजया अनिल कोळसे यांनी नदी खोलीकरणामुळे एक ते दीड किलोमिटरपर्यंतच्या नदी परिसरातील विहिरीची पाणी पातळी वाढण्यासाठी व सिंचनासाठी फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बेगाणी, नंदकिशोर लोंढे, विवेक, समाधान लोखंडे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील रमेश वाघमारे, श्रीराम वाघमारे, सुरेश भोरकडे, कैलास भोलाणे, किसन भोरकडे, शिवाजी उगले, सखाराम सोनुने, किसन खोडके, बबन उगले, गजानन सोनुने, रमेश खंडारे, अशोक सोनुने आदींची उपस्थिती होती.