कासाखेड ते डोंगरगाव शेतरस्ता लोकवर्गणीतून केला पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:36 AM2021-05-08T04:36:33+5:302021-05-08T04:36:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील नागरिकांनी एकजूट दाखवत सामंजस्याने लोकवर्गणीतून कासारखेड ते डोंगरगाव हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम : मेहकर तालुक्यातील कासारखेड येथील नागरिकांनी एकजूट दाखवत सामंजस्याने लोकवर्गणीतून कासारखेड ते डोंगरगाव हा शेतरस्ता तयार केला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचा माेठा त्रास वाचणार आहे.
कासारखेड ते डोगरगाव या शेतरस्त्याचा प्रश्न वर्षानुवर्षे खितपत पडला होता. प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले होते. कासारखेड व डोंगरगाव येथील शेतकऱ्यांना या मार्गाने शेतात जाण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या गोष्टीचा विचार करुन कासारखेडमधील शेतकऱ्यांनी या शेताकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांचा समूह तयार केला. समूह तयार करून लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली. वर्गणी जमा झाल्यानंतर भरपूर मेहनत करून तब्बल पंधरा दिवसांमध्येच ६०० मीटर लांबीचा व १४ फूट रुंदीचा शेतरस्ता तयार करून घेतला.
शेतकऱ्यांनी रात्रंदिवस एक करुन हा रस्ता तयार केला आहे. कासारखेड येथील शेतकऱ्यांचा आदर्श इतर गावातील शेतकऱ्यांनी घेण्याची गरज आहे.
शेतरस्ते माेकळे करण्याची गरज
सारशिव, कासारखेड व थार शिवारातीला उर्वरित शेतरस्ते शासनाने तयार करून घ्यावेत. एवढेच नव्हे तर महसूल विभागाने दैनंदिन कामकाजासह तालुक्यातील सर्व शेतरस्ते खुले करावेत. यासाठी महसूल विभागाने शेतरस्ते खुले करण्यासाठी माेहीम सुरु करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.