केबीसी फसवणूक, चौकशीची मागणी

By admin | Published: July 24, 2014 01:55 AM2014-07-24T01:55:06+5:302014-07-24T02:10:02+5:30

देऊळगावराजा तालुक्यातून मोठी गुंतवणूक.

KBC fraud, inquiry demand | केबीसी फसवणूक, चौकशीची मागणी

केबीसी फसवणूक, चौकशीची मागणी

Next

बुलडाणा : गुंतवणूकदारांना कोट्यवधी रूपयांनी गंडविणार्‍या केबीसीसह अनेक कंपन्यांचे धागेदोरे जिल्ह्यातही असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे. या कंपन्यांमध्ये देऊळगावराजा तालुक्यातून मोठी गुंतवणूक झाली असल्याची माहिती आहे.
केबीसी कंपनीच्या फसव्या योजनेला ग्रामीण भागातील जनताही बळी पडली. केबीसीप्रमाणे भूतकाळात इतरही काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा चुना लावल्याचे वृत्त लोकमतने दि. १९ जुलै रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये समृद्धी जीवनचा उल्लेखही अनावधनाने करण्यात आला होता. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांच्या फसवणुकीशी समृद्धी जीवन या कंपनीचा काहीही संबंध नसल्याची माहिती समोर आली आहे; मात्र अन्य कंपन्यांनी गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची माहिती खरी असून, याची चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: KBC fraud, inquiry demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.