शेतीउपयोगी दुकाने दिवसभर सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:16+5:302021-05-27T04:36:16+5:30
बीबी : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे़. त्यातच काेराेनामुळे निर्बंध लावण्यात आले आहे़त. शेतीउपयाेगी दुकाने ...
बीबी : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे़. त्यातच काेराेनामुळे निर्बंध लावण्यात आले आहे़त. शेतीउपयाेगी दुकाने दिवसभर सुरू ठेवण्याची मागणी गाेर सेनेच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे़
शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम जवळ आला आहे़. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी दिवसभर दुकाने उघडी असणे आवश्यक आहे. कारण शेतकऱ्यांना पैशाची जमवाजमाव करूनच दुकानात यावे लागते आणि दुकाने उघडी नसली की माघारी घरी जाऊन दुसऱ्यादिवशी यावे लागते़. त्यामुळे वेळ आणि खर्च याचा नाहक भुर्दंड होत असल्यामुळे दिवसभर दुकाने उघडी ठेवण्यात यावीत आणि बँकांनी पीककर्ज, पुनर्गठन लवकरात लवकर करण्यात यावेत, सर्वप्रकारच्या खतांच्या किमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणी गोर सेना तालुकाध्यक्ष यांच्यावतीने लोणार तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी गोर सेनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ़. विजय पवार यांच्या मार्गदर्शनात लोणार तालुका अध्यक्ष भारत राठोड, सुरेश पवार, साहेबराव राठोड, अनिल राठोड उपस्थित होते.