समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवा- डॉ. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 04:45 PM2018-09-04T16:45:54+5:302018-09-04T16:46:48+5:30
माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचा सकारात्मक प्रतिसाद महत्वाचा आहे. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म असून समाजात माणुसकी ज्योत तेवत ठेवण्यासाठी प्रयत्नरत रहा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी येथे केले.
खामगाव येथील आईसाहेब मंगल कार्यालयात आयोजित सामाजिक ऐक्य परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून हिवरा आश्रमचे गजानन शास्त्री, भिवंडी येथील पोलिस पब्लीक मोहल्ला कमेटीचे सदस्य सलाऊद्दीन, किर्तनकार सुशील वणवे, फादर शांतवन फुटेकर, भन्तेजी बुध्दरत्न, ग्यानीजी महेंद्रसिंह, अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे, पोलिस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सल्लाउद्दीन यांनी प्रेम हाच जगातील सर्वात मोठा धर्म असल्याचे सांगितले. तर गजानन शास्त्री महाराजांनी जगातील कोणताही धर्म वाईट नाही. मात्र, समाजातील काही आडमुठ्या लोकांमुळे सामाजिक तेढ निर्माण होत असून, माणसाला कोणत्याही धर्मात न विभागता, सामाजिक समतेसाठी प्रत्येकाने झटले पाहीजे, असे आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या उद्बोधनातून सामाजिक एकतेचा संदेश दिला. यावेळी शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले, ग्रामीण पोलिस स्टेशनचे रफीक शेख, पि.राजा पोलिस स्टेशनचे निरिक्षक निखिल फटींग, जलंब पोलिस स्टेशनचे निरिक्षक संदीप गाढे यांच्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाºयांची उपस्थिती होती. या सभेला शांतता समिती सदस्यांची उपस्थिती मोठ्यासंख्येने होती. प्रास्ताविक अप्पर पोलिस अधीक्षक श्याम घुगे यांनी केले. संचालन शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षण रविंद्र देशमुख यांनी केले.