गर्दीपासून स्वतः ला दूर ठेवा...काळजी घ्या! - डॉक्टरांचा सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 03:40 PM2020-03-30T15:40:57+5:302020-03-30T15:41:11+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितले आहे.
Next
- ेवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सध्या कोरोना व्हायरसने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. त्या पार्श्वभुमिवर नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कोणालाही न जुमानता ग्रामीण भागात मोकाट फिरणारांपासून नागरिकांनी स्वत:ला दूर ठेवावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. खामगाव तालुक्यात मोठ्या शहरातून आलेल्या ५२८४ जणांची तपासणी आरोग्य विभागाने केली असून ३७१५ जणांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले आहे. खामगाव तालुक्यात मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय अटाळी ७४२, बोथाकाजी ८०१, गणेशपूर १०१०, रोहणा ६१४, पिंपळगाव राजा ८७२, एनयुएचएम खामगाव २३७, सामान्य रुग्णालय खामगाव १००८ अशा ५२८४ जणांची आरोग्य तपासणी २९ मार्च रोजी सायंकाळपर्यंत करण्यात आली होती. तपासणी करण्यात आलेल्यांना ‘होमक्वारंटीन’ करण्यात आले असून यात अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७४२, बोथाकाजी ५७३, गणेशपूर २३२, रोहणा ६१४, पिंपळगावराजा ८७२, एनयूएचएम खामगाव २३७ तर सामान्य रूग्णालय खामगावअंतर्गत ४४५ अशा ३७१५ जणांना ‘होम क्वारंटीन’ करण्यात आले आहे. उर्वरित लोकांना होम क्वारंटीन करणे सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. ५० हजार पत्रकांचे वाटप!पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने ग्राम पंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. ग्राम पंचायंतींच्या माध्यमातून आतापर्यत ५० हजार जनजागृतीपर पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे. जंतुनाशक फवारणीची दुसरी फेरी!कोरोनाच्या पार्श्वभुमिवर ग्रामीण भागात संसर्गाचा धोका कमी व्हावा, यासाठी खामगाव तालुक्यातील ९७ गावांमध्ये जंतुनाशक द्रावणाची फवारणी करण्यात आली आहे. यामुळे जंतुनाशक फवारणीची पहिली फेरी पुर्ण झाली असून आता फवारणीच्या दुसºया फेरीला सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. होम क्वारंटीन करण्यात आलेल्यांनी अजिबात बाहेर फिरू नये. जे लोक विनाकराण फिरत असतील त्यांच्यापासून इतरांनी दूर राहावे. डॉ. दिनकर खिरोडकरतालुका आरोग्य अधिकारी