‘खाकी’ची रोगप्रतिकार शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:34 AM2021-05-23T04:34:35+5:302021-05-23T04:34:35+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे़ प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लावल्याने त्यांच्या अंमलजबावणीची ...
बुलडाणा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे़ प्रशासनाने वेगवेगळे निर्बंध लावल्याने त्यांच्या अंमलजबावणीची जबाबदारी पाेलिसांवर आली़ त्यामुळे गत वर्षभरात जिल्ह्यातील ४५६ अधिकारी, पाेलीस कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली आहे़ आतापर्यंत सहा पाेलीस कर्मचाऱ्यांचा काेराेनाने मृत्यू झाला आहे़
जिल्ह्यात गत वर्षापासून काेराेना रुग्णांची संख्या वाढतच आहे़ त्यामुळे आराेग्य विभागाबराेबरच पाेलीस प्रशासनावरचा ताण वाढला आहे़ गेल्यावर्षी काेराेना संक्रमण राेखताना १३ अधिकारी बाधित झाले हाेते़ तसेच १६४ अंमलदारांना काेराेनाची लागण झाली हाेती़ नियमांचे पालन करण्यासाठी पाेलीस प्रशासनाला रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागते़ दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात वाढल्याने प्रशासनावर ताण वाढला हाेता़ वर्षभरात ४६ अधिकाऱ्यांना काेराेनाची लागण झाली आहे़ तसेच ४१० कर्मचारी काेराेनाबाधित आहेत़ यापैकी ३८ अधिकाऱ्यांनी काेराेनावर मात केली असून ३५३ कर्मचारी काेराेनामुक्त झाले आहेत़ आतापर्यंत ३९१ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काेराेनावर मात केली आहे़ तसेच ६ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे़ दुसऱ्या लाटेत पाेलिसांनी राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपाययाेजना केल्याने केवळ ८ अधिकाऱ्यांना, तर ५१ पाेलीस कर्मचाऱ्यांना काेराेनाची बाधा झाली आहे़
काेराेनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पाेलीस विभागावर ताण वाढला आहे़ वर्षभरात ४५६ पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली आहे़ दुसऱ्या लाटेत पाेलिसांसाठी राेगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विविध उपाययाेजना करण्यात आल्याने काेराेनाचा शिरकाव झाला नाही़ ऑनलाईन याेग शिबिर, सकाळी शारीरिक कसरत व इतर उपाययाेजना राबविण्यात येत आहेत.
बजरंग बनसाेडे, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक, बुलडाणा.
काेराेना संसर्ग वाढत असल्याने राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पुरेशी झोप घेणे व सकाळी लवकर उठून प्राणायाम करणे हे कटाक्षाने पाळतो़ आहारात प्रोटिनयुक्त पदार्थांचा वापर जसे की डाळी, सोया, अंडी, चिकन, मटन, दूध आदींचा पुरेसा वापर करताे़
व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ या टॅबलेटचा वापर करताे़ तसेच लसीचे दाेन्ही डाेस घेतलेले आहेत़
जयसिंग पाटील, एपीआय, बुलडाणा.
राेगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी शारीरिक कसरती करताे़ तसेच याेगा, प्राणायामाबराेबराच प्राेटिनयुक्त पदार्थांचा भाेजनात वापर करताे़ तसेच ग्रीन ज्यूसचा वापर करताे़ व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन इ. या टॅबलेटचा वापर करताे़
साेमनाथ पवार, ठाणेदार, किनगावराजा
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम, प्राणायाम
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना सदैव ‘फिट अँड फाईन’ राहावे लागते. ही जाणीव ठेवून कोरोनाची बाधा होऊनही त्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी अल्पावधीतच सुरक्षितरीत्या बाहेरही आले. दैनंदिन व्यायाम, प्राणायाम, फळांच्या ज्यूसचे प्राशन करण्याचा फायदा झाल्याचे काहींनी सांगितले.