खामगावचा पाणी पुरवठा वांध्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:45 AM2017-10-05T00:45:41+5:302017-10-05T00:46:55+5:30
खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्या गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात खामगावकरांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्या गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात खामगावकरांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
गत काही दिवसांपासून सर्वत्र भारनियमनाचा त्रास सुरू आहे. खामगाव शहराला पाणी पुरवठा करणार्या गेरू माटरगाव धरण परिसरातही दररोज ६ तास भारनियमन होत आहे. सकाळी ३ व सायंकाळी ३ तास अशा दोन वेळेत हे भारनियमन केले जात आहे. मात्र या भारनियमनाचा जास्त त्रास खामगावकरांना सहन करावा लागत आहे. गेरू माटरगाव धरणावरून शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी येण्यासाठी ४ तासाचा वेळ लागतो. त्यामुळे भारनियमनाचे ३ तास व पाणी येण्यासाठी लागणारे ४ तास असे एकुण ७ तास वाया जातात. दिवसातून दोन वेळा ३-३ तास भारनियमन होत असल्याने २४ तासातील १४ तास व्यर्थ जात आहेत. उर्वरीत १0 तासातच पंपींग होते. शहराची आजची पाण्याची गरज लक्षात घेता दररोज किमान २0 तास पंपींग होणे आवश्यक आहे. मात्र भारनियमनामुळे हा कालावधी अध्र्यात आला आहे. यामुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होताना दिसत आहे. आधीच १0 दिवसावर पोहचलेल्या पाणी पुरवठय़ा त भारनियमनामुळे आणखी विलंब होत आहे. आधी पावसाअभावी धरणात पाणी नसल्याने शहरवासीयांसमोर जलसंकट उभे राहिले होते. परतीच्या पावसात गेरू माटरगाव धरणात पाणी आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र पाणी असतानाही लोडशेडींगमुळे खामगावकरांना पाण्यासाठी त्रास हो त आहे.
पालिकेचे तिसर्यांदा वीज वितरणला स्मरणपत्र!
-खामगाव शहराला पाणी पुरवठा करणार्या गेरू माटरगाव धरण क्षेत्रात भारनियमन रद्द करावे या मागणीचे पत्र आज पुन्हा पालिकेने वीज वितरणला दिले आहे. हे पालिकेचे तिसरे पत्र असून अद्याप भारनियमन बंद झालेले नाही.
-एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराच्या पाणी पुरवठय़ात भारनियमनामुळे वेळोवेळी व्यत्यय येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी खामगावकरांचा उद्रेक झाल्यास याला वीज वितरण जबाबदार असेल, असे सदर पत्रात नमूद असल्याची माहिती आहे.
-वारंवार सूचना देवूनही पालिका प्रशासनाच्या पत्राला वीज वि तरणकडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे दिसते.