नागरिकांची खामगाव पालिकेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 09:53 PM2017-08-21T21:53:21+5:302017-08-21T21:53:21+5:30

khamgaom public march to Municipality | नागरिकांची खामगाव पालिकेवर धडक

नागरिकांची खामगाव पालिकेवर धडक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील आयएचएसडीपी फेज- २ अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना घरकुलाचा लाभार्थी हिस्सा त्वरित देण्यात यावा, यासाठी शहरातील नागरिकांनी सोमवारी पालिकेवर
धडक दिली. एमआयएमचे शहर अध्यक्ष मो आरीफ यांच्यासोबतच काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण कदम यांची यावेळी उपस्थिती होती.
शहरात आयएचएसडीपी फेज- २ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आली आहेत; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या लाभार्थ्यांना लाभार्थी हिस्सा देण्यात आलेला नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही काहीच उपयोग होत नसल्याने, नागरिकांनी आज पालिकेवर धडक दिली. यावेळी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक प्रवीण कदम, एमआयएमचे शहर अध्यक्ष मो. आरिफ पहेलवान, अ.रहेमान, गजानन खंडागळे, लालाजी सांगळे, सय्यद तुफेल, शेख साबीर, रज्जाक कुरेशी, जावेद खान यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.









 

Web Title: khamgaom public march to Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.