खामगाव आगाराला दोन कोटींचे उत्पन्न
By admin | Published: April 17, 2015 01:31 AM2015-04-17T01:31:10+5:302015-04-17T01:31:10+5:30
४८ हजार पासधारक; खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश.
खामगाव (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगारातून जून २0१४ ते मार्च २0१५ या कालावधीत ४८ हजार प्रवाशांनी प्रवास सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. महामंडळामार्फत प्रवाशांसाठी विशेष सवलती दिल्याने पासधारकांकडून खामगाव आगाराला जवळपास दोन कोटी रूपये उत्पन्न झाल्याचा अंदाज आहे. ह्यबहुजन हिताय बहुजन सुखायह्ण हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळ अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर आहे. राज्यात दररोज ७२ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. प्रवाशांना नियमित, निश्चित, सुरक्षित व आरामदायी सेवा देणारी आणि दैनिक १८ हजार वाहनांद्वारे ५६ लाख किमी अंतर पार करणारी महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे पाहिले जाते. खेड्यातील प्रत्येक गावात एसटी पोहचवण्याचे कामही महामंडळाने केले आहे. दिवसेंदिवस खासगी वाहतुकीची मोठय़ा प्रमाणात संख्या वाढली असतानाही एसटीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वांंंत जास्त विद्यार्थी खामगाव शहरात ग्रामीण भागातून एसटी पासद्वारे अप-डाउन करतात. यासोबत ग्रामीण भागात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासा सवलतीकरिता अहिल्यादेवी होळकर योजना सुरू आहे. विद्यार्थी पास, मासिक, त्रैमासिक, महाराष्ट्र दर्शन, वार्षिक सवलत कार्ड आदी विविध खास योजना दिल्या आहेत. त्याचबरोबर यात्रा, सण, उत्सव, लग्न समारंभ अशा विविध प्रसंगी व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंंना शैक्षणिक सहलीसाठी (सवलत दराने) तसेच दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासी वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. जून २0१४ ते मार्च २0१५ या काळात खामगाव आगारात प्रवासी सवलतीचा ४८ हजार प्रवाशांनी लाभ घेतला असून, खाजगी वाहनांच्या स्पर्धेत वर्षभर प्रवासी एसटीशी जुळलेले असल्याचे दिसुन येते.