खामगाव- अकोला महामार्गावर उलटला तेलाचा टँकर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 05:16 PM2018-04-20T17:16:25+5:302018-04-20T17:16:25+5:30
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नजीकच्या गावातील नागरिकांनी पोलिस येईल तेलाची लूट केली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियत्रंणात आली.
गेल्या काही दिवसांपासून खामगाव- अकोला राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. परिणामी वाहन चालकांना वाहन चालविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान, शुक्रवारी जी.जे. १२ बी- ४१९२ क्रमांकाचा तेलाच्या टँकर चालकाचे आपल्या ताब्यातील वाहनावरून नियत्रंण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात टँकर प्रिपींगवळी फाट्यानजीक उलटला. या टँकरमधून तेलाची गळती होत असल्याची माहिती मिळताच आसपासच्या गावातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यातून तेल पळविले. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात तेलाची लूट करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे कर्मचारी तेथे दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनाला बाजूला करण्यात आले. या अपघातात टँकर चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, ग्रामीण पोलिस स्टेशनच्या कर्मचाºयांनी त्याला हुडकून काढले. प्रथमोपचारासाठी त्याला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.