खामगांव : ‘बॅरिकेड्स’वरून पालिका-पोलीस पोलीस प्रशासनात जुंपली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:25 AM2018-03-01T01:25:42+5:302018-03-01T01:25:42+5:30
खामगांव : नगरपालिकेने रस्ता काम करीत असताना पोलीस विभागाचे बॅरिकेड्स वापरून रस्ता बंद केला. त्यामुळे पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनात मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगांव : नगरपालिकेने रस्ता काम करीत असताना पोलीस विभागाचे बॅरिकेड्स वापरून रस्ता बंद केला. त्यामुळे पोलीस प्रशासन व पालिका प्रशासनात मंगळवारी दुपारी चांगलीच जुंपली होती.
खामगाव नगरपालिकेच्यावतीने भारत कटपीस ते फरशीपर्यंतच्या रस् त्याचे काम सुरू आहे. नगरपालिकेने २७ फेब्रुवारी रोजी पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता करणानी धान्य दुकान ते नवलचंद मिठुलाल ज्वेलर्स यांच्या दुकानापर्यंंत बॅरिकेड्स लावून शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता दुपारी ३ त ५ वाजतापर्यंत बंद करण्यात आला होता. यासंबंधी व्यापारी व नागरिकांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर ठाणेदार संतोष टाले यांनी त्या ठिकाणी येऊन नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाचे मोहन अहिर व नगरसेविका शहेरबानो जहिरउल्ला शाह यांचा मुलगा गुलजम्मा शाह यांना ठाणेदारांनी बोलावून हा मुख्य रहदारीचा रस्ता आहे. रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. रस्ता बंद करण्यासाठी कुणाची परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली. त्यावर संबंधित रस्त्याचे काम हे नगर परिषद प्रशासनाचे काम आहे, असे सांगण्यात आले. ठाणेदारांनी हा मुख्य रस्ता आहे. अर्धा रस्ता मोकळा ठेवून अध्र्या रस्त्यावर बॅरिकेट्स लावून काम करा. जर पूर्ण रस्ता बंद केला, तर कारवाई करावी लागेल, अशी तंबी ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.
काँग्रेस गटनेता टाले यांची तक्रार
पोलीस प्रशासनाने नगरपालिकेच्या कामात पोलीस विभागाचे बॅरिकेड्स कसे काय वापरण्यासाठी दिलेत, शहरातील प्रमुख रस्ता कोणाच्या आदेशाने बंद करण्यात आला, रस्ता बंद करण्यासाठी कुणाची परवानगी होती काय, याचा खुलासा मागवून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी न.प.काँग्रेस पक्षनेता अर्चना टाले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली.