खामगाव: देयक संग्राहकांचे मुख्याधिकाऱ्यांनी टोचले कान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 02:44 PM2019-09-04T14:44:36+5:302019-09-04T14:44:42+5:30
बदल्यांना विरोध करणाºया देयक संग्राहकांची मुख्याधिकाºयांनी चांगलीच कान उघडणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागात बदल्यांवरून निर्माण झालेला गोंधळ थांबणार असल्याचे संकेत आहेत. बदल्यांना विरोध करणाºया देयक संग्राहकांची मुख्याधिकाºयांनी चांगलीच कान उघडणी केली. त्यानंतर कर विभागातील विस्कळीत झालेले कामकाज रुळावर येणार असल्याचे दिसून येते.
प्रशासकीय दृष्टीकोनातून कर विभागाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी नगर पालिकेच्या देयक संग्राहक आणि संबंधितांच्या बदल्या २ आॅगस्ट रोजी करण्यात आल्या. यामध्ये गत अनेक वर्षांपासून एकाच वार्डातील कर वसुलीची जबाबदारी असलेल्यांची दुसºया वार्डात नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सर्वच वार्डातील कर संग्राहक आणि संबंधित कर्मचाºयांची फेर रचना करण्यात आली. दरम्यान, या फेर रचनेमुळे दुखावलेल्या कर्मचाºयांनी नविन नियुक्ती देण्यात आलेल्या वार्डात काम करण्यास नाराजी दर्शविली होती. इतकेच नव्हे तर सहा. कर अधिक्षकांविरोधात असहकार आंदोलनही कर विभागात छेडण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत बदलीच्या ठिकाणी काम करणार नसल्याचा इशाराही काही देयक संग्राहकांनी दिला होता. तर काहींनी राजकीय दबावातून बदली अथवा कामकाजातील बदलाचे ठिकाण बदलविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र, कर विभागातील बदलासंदर्भातील २ आॅगस्ट रोजीचा आदेश कायम ठेवत, आदेशातील नमूद केलेल्या ठिकाणी रूजू होऊन सहा. कर निरिक्षकांमार्फत अहवाल सादर करण्याचे निर्देश नुकत्याच एका बैठकीत दिले. त्यामुळे बदल्यांना तसेच बदलाला विरोध करणाºयांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येते.
शिस्तभंगांच्या कारवाईचा इशारा!
कर विभागातील २२ देयक संग्राहक आणि संबंधित कर्मचाºयांनी २ आॅगस्ट रोजी नमूद केलेल्या बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे. तसा अहवाल सहा. कर निरिक्षकांमार्फत तात्काळ सादर करावा. अन्यथा शिस्तभंगांच्या कारवाईस तयार रहावे, असा इशाराही मुख्याधिकाºयांनी शुक्रवारी दिल्याचे समजते.
लोकमत वृत्तांची दखल!
बदल्यांमुळे कर विभागात सुरू असलेल्या गोंधळाबाबत ‘लोकमत’ने २९ आॅगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, पालिका प्रशासनाने देयक संग्राहक आणि संबंधितांना आपल्या कर्तव्याप्रती अवगत करून दिले. त्यामुळे आता कर विभागातील कामकाज सुरळीत होणार असल्याचे संकेत आहेत.