खामगाव शहर पोलिस स्टेशनचे पालटले रुपडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:33 PM2019-02-23T12:33:14+5:302019-02-23T12:34:23+5:30

खामगाव :  स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  पोलिस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली अद्ययावत पाणेरी तक्रारकर्त्यांसोबतच वाटसरूंचीही ‘तहान’ भागवित आहे.

Khamgaon City Police Station's changing | खामगाव शहर पोलिस स्टेशनचे पालटले रुपडे!

खामगाव शहर पोलिस स्टेशनचे पालटले रुपडे!

googlenewsNext

- अनिल गवई
खामगाव :  स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.  पोलिस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली अद्ययावत पाणेरी तक्रारकर्त्यांसोबतच वाटसरूंचीही ‘तहान’ भागवित आहे. आकर्षक रंगरंगोटी आणि विविध विभागाच्या फलकांमुळे पोलिस स्टेशनने कात टाकल्याचे दिसून येते.

खामगाव शहर पोलिस स्टेशनतंर्गत पुरातन इमारतीची गेल्याच महिन्यात आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. तसेच इमारतीलगत टिनशेड उभारण्यात आले. याशिवाय पोलिसस्टेशनमध्ये कार्यरत प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र खोली, या खोलीवरच तेथे चालणाºया कामकाजाचे फलक लावण्यात आले. योग्य आणि दिशादर्शक फलकांमुळे सामान्य तक्रारदारांनाही पोलिस स्टेशनमध्ये ‘तक्रार कोठे द्यावे, कोणत्या विभागात कुणाला भेटावे’ यासह तत्सम माहिती सहज उपलब्ध होते.‘ड्युटी मदतगार, गुन्हे पथक, बारनिशी, क्राईम विभाग, बिनतारी संदेश कक्ष, ठाणे अंमलदार, ड्युटी आॅफीसर आणि पोलिस निरिक्षक कार्यालय’यासह पोलिस स्टेशनशी संबंधित सर्वच माहिती पोलिस स्टेशनच्या आवारात फलकांकित करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहर पोलिस स्टेशनचे रूपडे पालटत असल्याचे दिसून येते.

अद्यावत पाणेरीही कार्यान्वित!

शहर पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या पाणेरीवर आरओ फिल्टर बसविण्यात आला आहे. या फिल्टरमुळे पोलिस स्टेशनमध्ये येणाºया तक्रारदारांसोबतच सामान्य नागरिक आणि वाटसरूंसाठी ही पाणपोई मोठा आधार ठरत आहे. शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक संतोष ताले यांच्या पुढाकारातून  कर्मचाºयांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणलेत.

पोलिस हे नागरिकांचे कायम मित्र आहेत. नागरिकांना सुविधा देण्यासाठी   गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिस स्टेशनचे नुतनीकरण करण्यात आले. शुध्द पाण्याची सुविधा व्हावी म्हणून पाणेरीही येथे कार्यान्वित केली आहे. यासाठी पोलिस स्टेशनमधील प्रत्येकाचे अमुल्य योगदान लाभले आहे.

- संतोष ताले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.

Web Title: Khamgaon City Police Station's changing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.