खामगाव अतिक्रमणाच्या विळख्यात; पालिका प्रशासन झोपेत: फलकांद्वारे रस्त्यांचे व्रिदुपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:37 PM2018-07-20T13:37:33+5:302018-07-20T13:39:06+5:30

खामगाव :  खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच, गल्ली बोळीत अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे.

Khamgaon encroachment; Municipal Administration sleeping | खामगाव अतिक्रमणाच्या विळख्यात; पालिका प्रशासन झोपेत: फलकांद्वारे रस्त्यांचे व्रिदुपीकरण

खामगाव अतिक्रमणाच्या विळख्यात; पालिका प्रशासन झोपेत: फलकांद्वारे रस्त्यांचे व्रिदुपीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देशहराच्या कानाकोपºयात अतिक्रमण पोफावले असून, मुख्य रस्त्यांचा श्वास या अतिक्रमणामुळे कोंडल्या जात आहे. पालिकेकडून याबाबत कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नसल्याचेच चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  खामगाव नगर पालिका प्रशासनाकडून अतिक्रमणाकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच, गल्ली बोळीत अतिक्रमणाचा विळखा वाढत आहे. जाहिरात फलक काढण्यासाठीही कोणतीही उपाययोजना पालिकेकडून केल्या जात नसल्याने विद्रुपीकरणात भर पडत असल्याचे दिसून येते.

शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी या रस्त्यावरील  अतिक्रमण निमुर्लन करण्यासोबतच गल्ली बोळीतील अतिक्रमणावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांमार्फत वारंवार पालिका प्रशासनाला दिल्या जात आहेत. मात्र, शहरातील अतिक्रमण निर्मुलनाच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.  त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहिम थंडावली आहे. त्यामुळे शहराच्या कानाकोपºयात अतिक्रमण पोफावले असून, मुख्य रस्त्यांचा श्वास या अतिक्रमणामुळे कोंडल्या जात आहे. 

रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण निमुर्लन गरजेचे असताना पालिकेकडून याबाबत कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नसल्याचेच चित्र आहे. शहरातील अतिक्रमण निमुर्लनासाठी हवा तेवढा पोलिस बंदोबस्त देण्याची तयारी पोलिस प्रशासनाची आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अतिक्रमण निमुर्लनासाठी पथकही पाठविले होते. मात्र, पालिकेतील अतिक्रमण निमुर्लन विभागातील अधिकारी, कर्मचाºयांनी कोणतीही ‘रिक्स’ घेतली नाही. परिणामी या पोलिस पथकाला आल्या पावली परतावे लागले. त्याअनुषंगाने शहरातील अतिक्रमकांचे मनोबल उचावत असून, आता थेट शासकीय रुग्णालय रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने अतिक्रमण केल्या जात आहे. त्याचप्रमाणे पालिका इमारतीलाही अतिक्रमणाचा विळखा आहे. 


 

शुभेच्छा आणि जाहिरात फलकाद्वारे विद्रुपीकरण!

राजकीय पक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांसोबतच खासगी विक्रेते आणि व्यापाºयांकडून शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच चौकातही जाहीरात फलक लावल्या जात आहे. या फलक लावणाºयांविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने, शहराच्या विद्रुपीकरणात वाढ होत असल्याचे चित्र आहे.

शहरातील विविध रस्त्यावर २०० फलक!

राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांसोबतच प्लॉट विक्री करणाºया एका खासगी संस्थेने पालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात फलक लावले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच चौक आणि गल्लीबोळीतही हे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, पालिका प्रशासनाकडून फलक लावणाºयांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून येते. साध्या नोटीसही अदा करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अतिक्रमण निमूर्लन विभागाचे अधिकाºयांवर संशय व्यक्त केल्या जात आहे.
 

Web Title: Khamgaon encroachment; Municipal Administration sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.