खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:57 PM2019-11-27T15:57:01+5:302019-11-27T15:58:14+5:30

घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Khamgaon: Garbage collecting vehicles has been standing on the streets | खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या!

खामगावात तीन महिन्यापासून घंटागाड्या जागेवरच उभ्या!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव पालिकेला मिळालेल्या घंटागाड्या तीन महिन्यापासून एकाच जागेवर उभ्या आहेत. घंटागाड्यांची सेवा मिळत नसल्याने लाखो रुपयाचा खर्च पाण्यात गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी शासनाने घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील विविध भागात कचरा संकलनासाठी जीपीएस प्रणालीवर आधारीत घंटागाड्या उपलब्ध करून दिल्यात. सध्या घंटागाड्या पालिकेच्या आवारात शोभेच्या वस्तू बनल्या असल्याचे दिसून येते. त्यावर जीपीएस यंत्रणा कार्यान्वीत करून तत्काळ या घंटागाड्यांचा उपयोग कचरा संकलनासाठी करावा असे अपेक्षीत होते. मात्र आजरोजी तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी घंटागाड्यांची सेवा सुरु होवू शकली नाही. यामुळे नागरिकामध्ये पालिका प्रशासनाविषयी संताप व्यक्त होत आहे. शहरातील बहुतांश भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत. अनेक वार्डात तर फक्त मुख्य रस्त्यावरील कचरा उचलला जात आहे. मात्र गल्लीमध्ये साचलेल्या कचºयाच्या ढीगाकडे ढूंकूनही पाहिले जात नसल्याचे दिसून येते. खामगाव पालिकेमध्ये विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांचीच कमिशनवर अनेकदा जुंपल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकाराने मुख्याधिकाºयांना सुद्धा काम करण्यास अडचण जात असल्याची माहिती आहे. आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाने याबाबीची दखल घेवून स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून पालिकेच्या अधिकाºयांचे कानटोचण्याची गरज व्यक होत आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला हरताळ
स्वच्छ महाराष्ट्र अभियानअंतर्गत शहरात जमा होणाºया कचरा संकलीत करून त्यावर प्रक्रिया करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठीच घंटागाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या. मात्र नगर पालिका प्रशासनाच्या उदासिनतेने आजरोजी घंटागाड्यांचा उपक्रम खोळंबला असल्याचे दिसून येते. शासनाच्याच स्वच्छ महाराष्ट्र अभियानालाच एकप्रकारे पालिकेने हरताळ फासल्याचे दिसून येते.

पालिकेने ई निविदा मागितल्या होत्या. मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घंटागाड्या सुरु करण्यात अडचण जात आहे. नविन निविदा मागितल्या आहेत. पुढील महिन्यात घंटागाड्यांची सेवा नागरिकांना मिळू शकेल.
- धनंजय बोरीकर,
मुख्याधिकारी, खामगाव

Web Title: Khamgaon: Garbage collecting vehicles has been standing on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.