खामगावात कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान दोन गटात हाणामारी; वाहनांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:16 PM2018-02-22T13:16:28+5:302018-02-22T13:19:11+5:30
खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२ वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता दरम्यान घडली.
खामगाव: शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील अंतिम सामन्याच्यावेळी प्रतिस्पर्धी संघामध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन दगडफेकीत झाले. यात चार जण जखमी झाले असून, १०-१२ वाहनांची तोडफोड करण्यात आली. ही घटना २१ फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजता दरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत या भागात सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला आहे.
स्थानिक तानाजी व्यायाम शाळेच्यावतीने राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बुधवारी रात्री अंतिम सामना सुरू असताना खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नारेबाजी झाली. या नारेबाजीवरून एकाच समुदायातील दोन गट समोरा-समोर आले. यावेळी वादावादी झाल्यानंतर तुफान दगडफेक करण्यात आली. यात २५-३० दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, दगडफेकीत बजरंग दलाचे अमोल अंधारे यांच्यासह सौ. सुचेत्रा रवी तिवारी जखमी झाले आहेत.
अंतिम सामन्यात गोंधळ
समर्थ कब्बडी संघ आणि सती फैलातील हनुमान संघामध्ये अंतिम सामना सुरू होता. दरम्यान, नारेबाजीवरून खामगावातील सती फैलातील हनुमान मंडळ, शिवाजी नगरातील तानाजी मंडळ समोरा-समोर आले. या वादातून तुफान दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसात गुरुवारी दुपारी १ वाजेपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.