#खामगाव कृषी महोत्सव : बैलगाडी दिंडीद्वारे जनजागरण; कृषिमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:17 PM2018-02-16T14:17:31+5:302018-02-16T17:45:38+5:30
खामगाव : शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी शहरात आयोजीत चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता बैलगाडी दिंडी काढण्यात आली.
खामगाव : शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शहरात आयोजीत चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता बैलगाडी दिंडी काढण्यात आली. या बैलगाडी दिंडीला कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी स्वत: सहभागी होत बैलगाडी दिंडीचे नेतृत्व केले.
पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सव १६ ते २० फेब्रुवारीदरम्यान खामगाव शहरात होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होत आहे. या कार्यक्रमाला कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.डॉ संजय कुटे, अॅड. आकाश फुंडकर यांचेसह आमदार, खासदार यांचेसह भाजपचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहिल. या महोत्सवाची माहिती शेतकरी व जनसामान्यापर्यंत पोचवावी यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता भव्य बैलगाडी दिंडी काढण्यात आली. या बैलगाडी दिंडीला कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्षा सौ. अनिताताई डवरे, उपनगराध्यक्ष संजय उर्फ मुन्नाभाऊ पुरवार, पंचायत समिती उपसभापती भगवानसिंह सोळंके, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांसह भाजपा तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, शहराध्यक्ष संजय शिनगारे, ज्ञानदेवराव मानकर, लाला महाले, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती डॉ. गोपाल गव्हाळे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, ज्येष्ठ नेते शत्रृघ्न पाटील यांचेसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा सन्मान
सकाळी बैलगाडी दिंडी निघण्यापूर्वी सहभागी होणाºया शेतकºयांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यांच्यासाठी चहापान व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. बैलगाडी दिंडीत सहभागी सर्व शेतकरी बांधव भगवा फेटा लावून सहभागी झाले होते. तर बैलगाडी सुद्धा सजवण्यात आली होती. ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गाने निघून समारोप जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक ग्राऊंडवर झाला. या रॅलीत शेकडो शेतकरी बांधव बैलगाडीसह व ट्रॅक्टर घेवून सहभागी झाले होते. १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान खामगावात भव्य कृषी महोत्सव आयोजीत केला आहे. या महोत्सवात दररोज सायंकाळी विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजीत केले आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी
या महोत्सवादरम्यान शुक्रवारी, १६ फेब्रुवारीला संध्याकाळी ६ ते ७ विशेष सांस्कृतीक कार्यक्रम कृषी महोत्सवाचे विशेष आकर्षण राहील. तर शनिवारी, १७ फेब्रुवारीला सायंकाळी सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा गित गायनाचा बहारदार कार्यक्रम संध्याकाळी ६ ते १० या वेळेत होईल. रविवारी, १८ फेब्रुवारीला महाराष्ट्राची लोककला असलेल्या धमाकेदार लावणीचा कार्यक्रम सुप्रसिद्ध लावणी साम्राज्ञी चैत्राली राजे सादर करतील. यानंतर सोमवारी, १९ फेब्रुवारीला रात्री ८ ते १० छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडेल. या सर्व सांस्कृतीक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. हे सर्व कार्यक्रम निशुल्क राहतील. या कार्यक्रमाचा सहकुटूंब लाभ घेण्याचे आवाहन आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.