#खामगाव कृषी महोत्सव : कृषी तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना अनुभूती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:32 AM2018-02-18T01:32:48+5:302018-02-18T01:36:54+5:30

खामगाव: कृषी महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या प्रयोगशील शेतकर्‍यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांची यशोगाथा, कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध  बियाण्यांचे वाण, कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, पशुसंवर्धनाच्या विविध योजना  यासोबतच पाणलोट, ठिंबक सिंचनाच्या सोयी अन् पांरपरिक खाद्य संस्कृतीची  लज्जत असे एकत्रित दर्शन शेतकर्‍यांना होत आहे. पहिल्याच दिवशी हजारो शे तकर्‍यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

Khamgaon Krishi Mahotsav: Farmers have experience of agricultural technology! | #खामगाव कृषी महोत्सव : कृषी तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना अनुभूती!

#खामगाव कृषी महोत्सव : कृषी तंत्रज्ञानाची शेतकर्‍यांना अनुभूती!

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी हजारो शेतकर्‍यांनी घेतला लाभ कृषी प्रक्रिया, पशुसंवर्धन यांच्यासह आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: कृषी महोत्सवामध्ये राज्यभरातून आलेल्या प्रयोगशील शेतकर्‍यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांची यशोगाथा, कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या विविध  बियाण्यांचे वाण, कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, पशुसंवर्धनाच्या विविध योजना  यासोबतच पाणलोट, ठिंबक सिंचनाच्या सोयी अन् पांरपरिक खाद्य संस्कृतीची लज्जत असे एकत्रित दर्शन शेतकर्‍यांना होत आहे. पहिल्याच दिवशी हजारो शेतकर्‍यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

कृषी महोत्सवामुळे आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा मिळाली. पश्‍चिम विदर्भातील शे तकर्‍यांसाठी अतिशय उपयुक्त असा कृषी महोत्सव आहे.
- साहेबराव देशमुख, कारंजा लाड, जि. वाशिम

महिला बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी देण्यात आली आहे. या महो त्सवात तंत्रज्ञानाची माहिती होत आहे. याचा निश्‍चितच शेतकर्‍यांना लाभ होईल.
- सुशीलाबाई ढोले, शेतकरी महिला

अशाप्रकारच्या महोत्सवात आपण पहिल्यांदाच सहभागी झालो आहे. महो त्सवामुळे नवीन माहिती मिळाली. खरचं हा महोत्सव फायदेशीर आहे.
- शत्रुध्न मिरगे, शेतकरी, मानेगाव, जि. बुलडाणा.

बगायतीबरोबरच कोरडवाहू शेतीचाही या महोत्सवात विचार करण्यात आला  आहे. याचे समाधान आहे. महिला बचत गटही मोठय़ा प्रमाणात आहे.
- वच्छलाबाई ताडे, बावनबीर, जि. बुलडाणा.

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना अद्यावत तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करण्यास मदत  मिळेल; मात्र शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीही प्रभावी उपाययोजना कराव्यात.
- कमलाबाई घायाळ, शेतकरी महिला

Web Title: Khamgaon Krishi Mahotsav: Farmers have experience of agricultural technology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.