#खामगाव कृषि महोत्सव : खरपूस रोडगे, खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद, अन् गृहोपगोयी वस्तूंची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 03:52 PM2018-02-18T15:52:32+5:302018-02-18T15:54:59+5:30
खामगाव: खमंग, चमचमीत पदार्थ आणि सोबतीला रानगवऱ्यांमध्ये भाजलेले खरपूस रोडगे, मसालेदार वांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे.
खामगाव: खमंग, चमचमीत पदार्थ आणि सोबतीला रानगवऱ्यांमध्ये भाजलेले खरपूस रोडगे, मसालेदार वांग्याची भाजी...खांडोळी, मिरचीच्या भाजीचा आस्वाद...आणि सोबतच गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलमुळे खामगावकरांची चांगली चंगळ झाली आहे. पॉलीटेक्नीक ग्राऊंडवरील कृषि महोत्सव शेतकºयांसाठी नाही, तर खामगावकरांसाठी एक पर्वणी ठरत आहे.
महिला बचतगटांनी तयार केलेले मांडे, आवळा, खव्याची पुरणपोळी, चुलीवरची ज्वारी, बाजरीची भाकरी, खांडोळी, मिरचीची भाजी, पातोळीची भाजी सर्वांच्याच पसंतीस उतरली आहे.
येथील पॉलीटेक्नीक ग्राऊंडवरील कृषि महोत्सवात कृषि तंत्रज्ञानासोबतच, कृषि अवजारे, ट्रॅक्टर, पशूधन, विविध प्रकारच्या कडधान्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत. कृषि तंत्रज्ञान अवगत करण्यासोबतच शेतकºयांना आणि खामगावकर खवय्यांना विविध प्रकारच्या खमंग, चमचमीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी स्टॉलवर गर्दी होत आहे. ग्रामीण भागातील बचतगटांच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा गंध आपसूकच शेतकरी, नागरिकांना आकर्षित करीत आहे. तसेच महिला बचतगटांनी उपलब्ध करून दिलेली सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या मिरचीची पावडर, हळद, सहद, आवळा, बिट सरबत आणि गहू, तीळ, जवस, विविध प्रकारच्या डाळींची मागणी वाढली आहे. (प्रतिनिधी)