#खामगाव कृषि महोत्सव : आरोग्यवर्धक वनौषधींविषयी खामगावकरांना कुतूहल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 16:02 IST2018-02-18T16:00:47+5:302018-02-18T16:02:57+5:30
खामगाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक वनौषधी शेतकºयांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहे.

#खामगाव कृषि महोत्सव : आरोग्यवर्धक वनौषधींविषयी खामगावकरांना कुतूहल!
खामगाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक वनौषधी शेतकऱ्यां सोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहे. शेतकरी, खामगावकर वनौषधींची उपयुक्तता जाणुन घेत आहेत.
घरामध्ये आपण फुलझाडे लावतो. परंतु त्याची उपयोगीता व उपयुक्तता आपणास ठाऊक नसते. नागरिक व शेतकऱ्यां ना घरामध्ये वनौषधींची उपयोगिता कळावी आणि त्यांनी घरामध्ये वनौषधींची रोपे लावावी. या दृष्टीकोनातून नागार्जुन वनौषधी उद्यानाच्या वतीने तिखाडी, वाळा, गवती चहा, जिरॅनियम, सर्पगंधा, जावा सिट्रोनला, सदाफुली, अडुसळा, शतावरी आणि ब्राम्हीसारख्या वनौषधी, त्यांची रोपे, बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. घरामध्ये सदाफुली, अश्वगंधा, सर्पगंधासारख्या वनौषधी असतात. परंतु त्याची उपयोगिता माहिती नसते. त्या दृष्टीकोनातून वनौषधींचा कोणत्या आजार कसा उपयोग केला जातो. याची माहिती देण्यात येत आहे. सर्पगंधाच्या मुळ्यापासून रक्तदाबावर औषध, गुळवेलचा जीर्ण, विषमज्वर, यकृत कमजोरी, धतुरा/धोत्राचा उपयोग उदरशूल, उपदंश आणि सदाफुलीचा उपयोग कॅन्सर व रक्तदाबावर औषधी बनविली जाते. अशी माहितीही याठिकाणी शास्त्रज्ञांकडून देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)